आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने खरेदीच्या भारतीय मानसिकतेचा अभ्यास : रिझर्व्ह बँक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोने विकत घेण्यासाठी लोक आपल्या कमाईचा सर्वात मोठा वाटा का खर्च करतात, याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती भारतातील कुटुंबीयांच्या खर्च करण्याच्या पद्धतींचा तसेच जगातील विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत भारतीय कौटुंबिक आर्थिक तथ्य तसेच स्थितींचा अभ्यास करेल. ही समिती ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक तरुण रामादोराई यांच्या नेतृत्वात काम करणार आहे. यात सेबी आणि इर्डासारख्या नियमन संस्थांच्या प्रतिनिधींचाही समावेश असून ते जुलै २०१७ पर्यंत त्यांचा अहवाल देतील. भारतीय लोक आवश्यक खर्चांपेक्षा सोने विकत घेण्याला का प्राधान्य देतात. भारतात एफडी आणि पेन्शनसारख्या कौटुंबिक आर्थिक बाजाराचा प्रमुख देशांच्या तुलनेत सध्याच्या सखोलतेचा अभ्यासही ही समिती करेल. शिवाय, मागच्या दशकभरात पेन्शन, प्रॉपर्टी, गृहकर्जासारखे औपचारिक बाजार आणि कौटुंबिक मागण्या तसेच स्वरूपाचाही यात अभ्यास केला जाईल. रिझर्व्ह बँकेच्या मते, ही समिती औपचारिक आर्थिक बाजारात सामान्य भारतीयांची भागीदारी वाढवण्यासाठी प्रोत्साहन आणि नियमनासाठी व्यवस्थेची रचना तसेच सध्याच्या व्यवस्थेच्या पुनर्रचनेचे मूल्यांकनही करेल.

अौपचारिक आर्थिक बाजारात पेन्शनसारखे गुंतवणुकीचे उत्पादन आणि गृहकर्जासारख्या जबाबदारीच्या मागणीवरील चर्चेसाठी एप्रिल महिन्यात आर्थिक स्थैर्य आणि विकास परिषदेच्या उपसमितीची (एफएसडीसी-एससी) बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतातील कुटुंबीयांच्या खर्च करण्याच्या पद्धती कशा आहेत, याविषयीचे तथ्य जाणून घेण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत असल्यामुळे आयातीची आकडेवारी वाढत आहे. त्यातच भारतातील लोक सोन्यावर जास्त पैसा खर्च करत असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे.
बातम्या आणखी आहेत...