आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अाता नव्या निकषांसह राबवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुुंबई - संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्थगित करण्यात येत असल्याच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अाराेपाचे सरकारने बुधवारी खंडन केले. नवीन निकषांनुसार हे अभियान आता अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे देण्यात आले आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील काही घटक केंद्र शासनाच्या निर्मल ग्राम पुरस्कार योजनेवर आधारित होते. केंद्राने ही योजना बंद केली आहे. त्यामुळे ग्रामस्वच्छता अभियानातही बदल करणे आवश्यक आहे. तसेच केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाच्या उद्दिष्टानुसार २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शौचालयाचे बांधून देऊन राज्य हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय अाहे. हे लक्ष‌्य वाढल्यामुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या निकषात बदल करणे आवश्यक झाले आहे. संपूर्ण ग्रामीण क्षेत्र मर्यादित कालावधीत हागणदारीमुक्त करावयाचे असल्याने विस्तृत प्रमाणात अाता ही याेजना राबविली जाणार अाहे.