आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stylist Of Jiah Khan Found Dead In Mysterious Circumstances

जिया खानचा स्‍टा‍यलिस्‍ट अनिल चेरियनचा संशयास्‍पद मृत्‍यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तीन महिन्‍यांपूर्वी आत्‍महत्‍या करणारी अभिनेत्री जिया खान हिचा स्‍टायलिस्‍ट राहिलेला अनिल चेरियन याचा रहस्‍यमयरित्‍या मृत्‍यू झाला. गोराई समुद्र किना-यावरील एका बंगल्‍यात त्‍याचा मृतदेह आढळला आहे.

चेरियनचा मृतदेह बंगल्‍यातील विहिरीत आढळला. प्राप्‍त माहितीनुसार, शनिवारी रात्री अनिल चेरियन प्रेयसी आणि काही मित्रांसोबत पार्टीसाठी गोराई येथील बंगल्‍यावर गेले होते. चेरियन यांचे संबंध चांगले नव्‍हते, अशी माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्‍यांची पत्‍नी शिवानी हिने त्‍यांना फोन केला होता. त्‍यावेळेस मोबाईल बंद होता. त्‍यानंतर तिने चेरियन बेपत्ता असल्‍याची तक्रार दाखल केली.

पोलिसांना गोराई येथील बंगल्‍यातून काही संशयास्‍पद वस्‍तू आढळल्‍या आहेत. चेरियन यांच्‍यासोबत पार्टीत सहभागी झालेल्‍या लोकांची चौकशी करण्‍यात आली आहे. चेरियनच्‍या प्रेयसीचा जबाब पोलिसांना काहीसा गोंधळलेला वाटत आहे. त्‍यामुळे सर्वांचीच कसून चौकशी करण्‍यात येणार आहे.

अनिल चेरियन याने जिया खानसाठी काम केले होते. जिया खानने पहिले काम चेरियन याच्‍यासोबतच पूर्ण केले होते. अभिनेत्रा शेखर सुमन यांच्‍यासाठी चेरियनने दिर्घ कालावधीसाठी काम केले होते. सध्‍या तो जिया खानच्‍या आयुष्‍यावर बनविण्‍यात येत असलेल्‍या 'बोल्‍ड बॉलिवूड' या चित्रपटासाठीही तो काम करत होता.

फोटो- शेखर सुमन यांच्‍यासोबत अनिल चेरियन.