आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संकटाच्या काळात हसत राहणे गरजेचे : सुभाष घई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मागील काही महिन्यांपासून ज्येष्ठ दिग्दर्शक ‘शोमन’ सुभाष घई त्यांच्या व्हिसलिंग वुड्स या संस्थेमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर अनेकांनी टीकेची झोड उठवली. संकटाच्या काळात व्यक्तीने हसत राहणे महत्त्वाचे असल्याचे घई यांनी शुक्रवारी सांगितले. भारतीय चित्रपटाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते व्हिसलिंगमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 4 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 20 एकर जागा परत करण्याचे आदेश दिले होते. तसेच या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना न्यायालयाने सुनावले होते. या वेळी घई म्हणाले, आयुष्यात संकटे येत असतात आणि जात असतात. त्यांचा सामना करावाच लागतो. मग तो हसतमुखाने का नको? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या वेळी रणबीर, गुलजार आदी उपस्थित होते.