आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्येत ऑक्टोबरपर्यंत राम मंदिर, आता पुढची दिवाळी तेथेच साजरी करू - सुब्रह्मण्यम स्वामी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राम मंदिर बांधणीच्या सर्व तयाऱ्या पूर्ण झाल्या असून ऑक्टोबर पर्यंत अयोध्येत राम मंदिर उभारले जाईल असा दावा भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला. एवढेच नव्हे, तर पुढील दिवाळी अयोध्येतील त्याच राम मंदिरात साजरी करू. येथील माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. स्वामीनारायण मंदिराप्रमाणेच या मंदिराचे भाग देखील आधीच तयार आहेत. ते केवळ जोडावे लागणार आहेत असेही ते पुढे म्हणाले आहेत. 

कायदा करण्याची गरज नाही


> स्वामींनी सांगितल्याप्रमाणे, राम मंदिरवर वेगळा कायदा तयार करण्याची काहीच गरज नाही. नृसिंह राव यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन सांगितले होते. तेथे राम मंदिर असल्याचे सिद्ध झाल्यास ती जागा हिंदूंना देण्यात यावी. आणि तेथे राम मंदिर होते हे सिद्ध झाले आहे. 
> सुन्नी वक्फ बोर्डाकडे आमचे दावे खोटे ठरवण्यासाठी पुरावे किंवा आधार नाही. त्यामुळे, सुप्रीम कोर्टात आपला विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
> मुस्लिमांना ती केवळ प्रॉपर्टी म्हणून हवी आहे. तर हिंदूंचा त्यावर पूजा करण्याचा नैतिक अधिकार आहे आणि तो मिळणारच असा दावाही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...