आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Succesful Mars Mission, Cm Chavan Congrats Isro Scientists

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'MOM\'ची मोहिम फत्ते हा देशासाठी कौतुकास्पद व मंगल क्षण - पृथ्वीराज चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेले मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावले असून आपला भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा देश ठरला. भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी हा अभिमानास्पद मंगल क्षणआहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
भारताने MOM (Mars Orbiter Mission) या नावाने ऑक्टोबर 2013 मध्ये पाठविलेल्या भारतीय मंगळयानाने आज सकाळी सात वाजून 17 मिनिटांनी मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश केला आणि नियोजित कार्यक्रमाप्रमाणे मोहीम यशस्वी केली. याबद्दल आनंद व्यक्त करुन चव्हाण यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.

चव्हाण म्हणाले की, भारताने अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली ही झेप कौतुकास्पद असून यामागे शास्त्रज्ञांचे अथक कष्ट आणि बुद्धिमत्ता आहे. अशा मोहिमा या एक दोन दिवसांच्या नसतात, तर त्यासाठी वर्षानुवर्षे तयारी, नियोजन आणि अमलबजावणी करावी लागते. म्हणुनच पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेली ही मोहिम भारताची प्रगती अधोरेखित करणारी ऐतिहासिक घटना आहे. आता ख-या अर्थाने यानाच्या कामगिरीला सुरुवात झाली आहे आणि नियोजनानुसार या मंगळयानाची सर्व कामगिरी अपेक्षेनुसार पार पडेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
सहा वर्षे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून काम करताना आपण अंतरिक्ष विभागाचीही जबाबदारी सांभाळली. याच काळात मला अंतरिक्ष आयोगाचा (Space Commission) पहिला राजकीय सदस्य म्हणुन काम करण्याचीही संधी मिळाली. या नात्याने इस्रोचे शास्त्रज्ञ आणि परिवाराचे अभिनंदन करताना मला अभिमान वाटतो, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनाही या मोहिमेत यश आल्याबद्दल देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
अजित पवारांनीही केले अभिनंदन, वाचा पुढे...