मुंबई - पाकिस्तानची निर्मिती ही फक्त जीनांमुळेच झाली नाही, तर काँग्रेसच्या नेत्यांचीही त्यामध्ये भूमिका होती, असे मत ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भारत पाकिस्तान संबंधावरील विविध मुद्द्यांवर त्यांनी मत मांडले. दहशतवादामुळे पाकिस्तानची जगात बदनामी झाली हे खरे आहे. मात्र, पाकिस्तान शत्रूराष्ट्र आहे हे मला मान्य नाही, तर पाकिस्तानमधील काही लोक भारताचे शत्रू आहेत असेही ते म्हणाले.
पाकिस्तान सातत्याने आपल्यावर हल्ले करतेा त्यामुळे त्यांचा पुळका कशासाठी? या दर्शकांच्या प्रश्नावर कुलकर्णी म्हणाले की, चांगले काम करणा-या पाकिस्तानींना विरोध नसावा. खुर्शीद कसुरींसारख्या अनेक लोकांना भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालणे ही बाब महाराष्ट्र, मुंबईसाठी कलंक आहे. कोणालाही आव्हान देण्याचा माझा स्वभाव नाही, मी आजही उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू शकतो असे ते म्हणाले.
- भारत आणि पाकिस्तानचे शस्त्रांवर कित्येक रूपये खर्च होतात. दुसरीकडे दोन्ही देशातील गरीबी वाढत आहे. त्यामुळे हा इतिहास बदलला पाहिजे. मी शांतीसाठी संघर्ष करणार आहे, असेही ते म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कुलकर्णी यांनी का नव्हता काढला चेह-याचा काळा रंग..