आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sudhir Mungantiwar Gift Tiger To Shiv Sena Chief Udhav Thackeray

सुधीर मुनगंटीवार देणार उद्धव ठाकरेंना वाघाची भेट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात फायबरचा एक वाघ सोमवारी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. दूरवरून बघितला तर खराखुरा वाटावा इतका सुरेख हा वाघ बनवला आहे. ‘या वाघाचे करणार काय? मुनगंटीवार यांच्या कार्यालयात तो ठेवला जाणार की नव्याने बनवण्यात आलेल्या तळमजल्यावरील प्रशस्त विभागात तो ठाण मांडून बसणार,’ असे प्रश्न िवचारले जात आहेत. अखेरीस या प्रश्नांचे उत्तर मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुनगंटीवार स्वत: हा वाघ भेट म्हणून देणार अाहेत. हा फायबरचा वाघ नाशिकमध्ये बनवण्यात अाला अाहे.
िवधानसभा िनवडणुकीच्या आधी युतीतील मोठा भाऊ असलेल्या िशवसेनेला निकालानंतर छोट्या भावाच्या भूमिकेत जावे लागले अाणि सत्तेतही मानाचे स्थान मिळाले नाही. त्यामुळे नाराज असलेल्या िशवसेनेने सत्तेत असूनही भाजपवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. युती असूनही धुसफूस कायम असताना मुनगंटीवारांची वाघ भेट युतीत संवादाचे नवे दालन उघडू शकते, असे यानिमित्ताने बाेलले जात आहे.

‘सेव्ह टायगर’साठी जनजागृती
१७ जानेवारीला हाेणाऱ्या मुंबई मॅरेथाॅनमध्येही ताडोबा फेस्टिव्हल व सेव्ह टायगरचा प्रचार-प्रसार केला जाणार आहे. यासाठी वाघाची अन्य एक प्रतिकृती शर्यतीच्या िठकाणी ठेवण्यात येईल. या जागेला ‘टायगर सेल्फी काॅर्नर’ म्हणून नाव देण्यात आले आहे. तिथेच वन िवभागाकडून स्टाॅल उभारण्यात येणार असून या स्टाॅलद्वारे सेव्ह टायगर अभियानाची माहिती देण्यात येईल. याशिवाय ८ ते ११ जानेवारीदरम्यान शर्यतीत सहभागी होणाऱ्यांना प्रवेशिका देण्यात येणार अाहेत. यावेळी शर्यतीत सहभाग घेणाऱ्यांना सर्वांना ताडोबा फेस्टिव्हल व सेव्ह टायगरचे महत्त्व पटवून िदले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुनगंटीवार व सेव्ह टायगर अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर अमिताभ बच्चन मॅरेथाॅनला उपस्थित राहणार अाहेत.