आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MH Budget: \'अर्थसंकल्प\' बळीराजाला समर्पित; राज्याच्या बजेटवर केंद्राची छाप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेरोशायरीने फडणवीस सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यंदाचे वर्ष 'शेतकरी स्वाभिमान वर्ष' साजरे करणारे असून 'अर्थसंकल्प' बळीराजाला समर्पित केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत शेती व शेतकऱ्यांसाठी 25 हजार कोटींची तरतूद केली आहे. याचबरोबर राज्य सरकारनेही केंद्रांप्रमाणे पायभूत सुविधांना प्राधान्य दिले. यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर जेटलींची छाप दिसत आहे.

'घने अंधेरो से था भरा हुआ ओ घर जो मिला
नही किया मगर हमने कोई शिकवा या गिला
बडी हिम्‍मत से संभलके उठाये हमने कदम
तब कही जाके उजालो का संमंदर सा मिला...'
मुनगंटीवार यांनी या हिंदी शायरीने भाषणाला सुरुवात केली.

वाचा काय स्वस्त... काय महाग!
काय स्वस्त होणार - शैक्षणिक साहित्य, बॅटरी व सौर उर्जेवर चालणारी वाहने, एलईडी बल्ब, जुनी वाहने, सरकी, सोलापूर चादर, टॉवेल्स, मनुके, सरकी तेल, शेतीच्या काटेरी कुंपण आणि जाळी, इंजेक्शन, ब्रेस्ट कॅन्सर टेस्टसाठी वापरण्यात येणारी मॅमोग्राफी, बांबूपासून बनवलेले फर्निचर

काय महागणार- चहा, खोबरेल तेल, लॉटरी, तीन चाकी वाहने, मार्बल, ग्रॅनाईट, 90 सीसी वरील वाहने, मार्बल आणि ग्रेनाईट


अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले...
शेतकर्‍यांना मिळणार अल्प व्याजदराने कर्ज...
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकसाच मांडलेल्या अर्थसंकल्पाचा 'शेतकरी' हा केंद्रबिंदू ठरला आहे. राज्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून 5 हजार 2 कोटी 82 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय सरकार शेतकर्‍यांना अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात अन्न उपलब्ध व्हावे यासाठी औरंगाबाद, नागपूर, अमरावती विभागातील शेतकर्‍यांसाठी 1 हजार 32 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पीक विम्यासाठी 1 हजार 885 कोटी, जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी 1 हजार कोटी, शेततळी, विहिरी, विद्युत पंप जोडणीसाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कृषीप्रक्रिया उद्योग उभारणाऱ्याला 25 टक्के किंवा 50 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.कडधान्य आणि तेलबीयांसाठी 80 कोटींची तरतूद तर नाशिक, जळगाव आणि अकोल्यात दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात कृषीमहोत्सवाचे आयोजन करण्‍यात येणार आहे. यासाठी 10 कोटी 80 लाखांची तरतूद करण्‍यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून तीन आदर्श शेतकरर्‍यांना सन्मानित करण्‍यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या ज्ञानाच्या प्रसारासाठी कृषी गुरूकुल योजना सुरु करण्‍यात येणार आहे.

कृषी विद्यापीठांत स्वतंत्र सेंद्रीय शेतीअभ्यास केंद्रांची स्थापना करण्‍यात येणार आहे. तसेच पाऊस,वारा,आर्द्रता आणि तापमानाची नोंद घेण्यासाठी स्वतंत्र हवामान केंद्राची जिल्हास्तरीय उभारणी करण्‍यात येणार आहे. दुग्धव्यवसाय सहाय्यक केंद्राची स्थापना करण्यासाठी नाबार्डचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भाला प्राधान्य देण्यात आले आहे.

जलसिंचन योजनेसाठी 7850 कोटींची तरतूद...
यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या ताबडतोब लाभ देणाऱ्या योजनांसाठी 7850 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे. याशिवाय प्रधानमंत्री जलसिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या राज्यातील 7 प्रकल्पांसाठी 2078 कोटींची तरतूद करण्‍यात आली आहे. पुण्यातील यशदा केंद्रात जलसाक्षरतेसाठी एक मुख्य केंद्र तर लातूर व अमरावतीत उपकेंद्र उभारण्यात येणार आहे.

त्याचबरोबर ग्रामीण पेयजल योजनेसाठी 170 कोटी तर मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली.
रस्त्यांचा प्रश्न निकाली... 550 कोटींची तरतूद
राज्यभरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 550 कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. 3924 किलोमीटरचे नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित करण्यात आले आहे. पाणंद आणि शेती रस्त्यांच्या दुरूस्तीची काम ग्रामीण भागातील युवकांनाच मिळतील आणि त्यासाठीच्या मशिनरीसाठी कर्ज त्यांना दिले जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. विशेष म्हणजे कर्जावरील व्याजाचे दायित्व सरकार स्विकारणार आहे. या योजनेसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली.

कल्याण-भिवंडी-शिळफाटा असा उन्नतमार्ग बांधला जाणार आहे.यासाठी 40 कोटींची घोषणा करण्यात आली. या उन्नतमार्गामुळे कल्याणमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

वस्त्रोद्योगांला चालना देणार
यंदाच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी कापूस उत्पादक भागात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासाठी 265 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रांना दिल्या जाणाऱ्या सवलतींसाठी 2625 कोटींची तरतूद, दिल्ली- अहमदाबाद कॉरिडॉरअंतर्गत औरंगाबादेतील शेंद्रामध्ये प्रकल्प व राज्यातील असंघटित कामगारांकरता प्रणालीला 18 कोटी 92 लाखांची तरतूद करण्‍यात आली आहे. तरुण रोजगारांना मुद्रा बॅंकेतील योजनांच्या लाभासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण करण्यासाठर 20 कोटींची तरतूद करण्‍यात आली आहे.

दरम्यान, अर्थसंकल्प सादर करण्‍यापूर्ण मुनगंटीवार यांनी सकाळी अकरा वाजता सपत्नीक सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. राज्याची आर्थिक प्रगती वेगाने होऊ दे, असे साकडे त्यांना सिद्धिविनायकाला घातले.
महिला सक्षमीकरणावर भर... तेजस्वीनी बस
राज्य सरकारने महिला समक्षीकरणावर भर दिला आहे. सुमतीबाई सुकळीकर महिला सक्षमीकरण योजना अंतर्गत 100 कोटींची तरतूद करण्यात आली. पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, कल्याण डोंबिवली भागातील महिला प्रवाशांसाठी 300 तेजस्वीनी बसेससाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आले आहे. तसेच निराधार, परितक्त्या, विधवा महिलांसाठी 1 एप्रिलपासून मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्‍यात येण्याची घोषणा करण्‍यात आली आहे. यासाठी 332 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. न‍िराधार महिलांना किमान 700 रूपये मासिक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

दारिद्ररेषेखालील कुटुंबांसाठी 'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेसाठी 25 कोटी, आदर्श अंगणवाडी योजनेअंतर्गत 10 हजार अंगणावाड्या आदर्श करण्यात येणार आहे. यासाठी 100 कोटींची तरतूद करण्‍यात आल‍‍ी आहे. अंगणवाडी सेविकेंच्या सुरक्षेसाठी 2 लाखांचा विमा आणि हफ्ता शासन भरणार आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, अर्थसंकल्पात करण्‍यात आलेल्या तरतूदी...
बातम्या आणखी आहेत...