आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी फक्त उत्तर प्रदेशसाठी मर्यादित नसेल, महाराष्ट्रातही लागू हाेईल; मुनगंटीवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे अाश्वासन दिले अाहे. मात्र तसा निर्णय झाल्यास ताे एकट्या उत्तर प्रदेशपुरता मर्यादित नसेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही लागू हाेईल,’ असे स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बाेलताना दिले.
 
‘भाजपने उत्तर प्रदेशात कर्जमाफीचे अाश्वासन दिले अाहे. मग महाराष्ट्रात सरकार असताना येथील शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही?’ असे प्रश्न विराेधकांसह सत्ताधारी शिवसेनेकडून उपस्थित केले जात अाहेत. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी हे संकेत दिले.
 
मुनगंटीवार म्हणाले, ‘केंद्र सरकार एका राज्यासाठी कर्जमाफीची घाेषणा करू शकत नाही. जर उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाली तर ती महाराष्ट्राला देखील लागू हाेईल. मात्र केंद्राकडून कर्जमाफीचा निर्णय हाेईपर्यंत अाम्ही राज्यात कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढवण्याचा प्रयत्न केला अाहे. महाराष्ट्राच्या तिजाेरीवर सर्वात अाधी शेतकऱ्यांचा अधिकार अाहे,’ असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...