आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suffron Flag Hoist, But Unhappiness Continue In Shiv Sena

सत्तेच्या मोहापायी भगवा फडकला; पण शिवसेनेत नाराजी कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सत्तेच्या मोहापायी शिवसेनेच्या नेत्यांनी स्वाभिमान बाजूला ठेवत सरकारमध्ये सहभाग घेतला असला तरी या निर्णयामुळे सामान्य शिवसैनिक व काही नेत्यांमध्ये नाराजीच आहे. इतकेच नव्हे तर ज्यांना सत्तेत वाटा मिळाला, तेही दुय्यम मंत्रिपदे मिळाल्याने नाराज असल्याचे दिसते. एका राज्यमंत्र्याने सोमवारी ‘दिव्य मराठी’कडे याच कारणामुळे नाराजी व्यक्त केली, तर मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी चक्क अधिवेशनाकडे पाठ फिरवली.

शिवसेना सत्तेत आल्यास पक्षातील एकमेव वरिष्ठ महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा होती. स्वतः नीलम गोऱ्हे यांनाही तसे वाटत होते. परंतु त्यांचा पत्ता कट झाला. प्रवक्तेपदी निवड झाली तेव्हाच आपला पत्ता कट होणार असे त्यांनी काही पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे निश्चित झाली तेव्हापासूनच नीलम गोऱ्हे नाराज होत्या. सोमवारी अधिवेशनासाठी त्या नागपुरात आल्या असल्या तरी विधान भवनाकडे फिरकल्याच नाहीत. त्यांच्या समर्थकांनी मात्र त्या नाराज नसल्याचे सांगितले. व्यक्तिगत कारणामुळे त्या आल्या नसल्याचे शिवसेनेतून सांगण्यात आले.

राज्यमंत्रीही नाराज
शिवसेनेच्या एका राज्यमंत्र्याने सांगितले की, ‘निवडून आल्यानंतरही आमच्या वाट्याला राज्यमंत्रिपदच आले. जो हरला त्याला मात्र कॅबिनेट पद दिले. खरे तर माझा पत्ता कट करण्याचा प्रयत्न काहींनी केल्यानेच मला कॅबिनेट मंत्रिपद मिळाले नाही,’ असेही त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचेही ते म्हणाले.