आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळप बंद झाल्यावर कच्च्या साखरेला अनुदान, एफआरपी देण्यास ८० कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- साखर कारखान्यांना कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी प्रति क्विंटल एक हजार रुपये प्रोत्साहन मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. मात्र, बहुतेक कारखान्यांनी गाळप बंद केले असल्याने या अनुदानाचा लाभ साखर कारखान्यांना होणार नसल्याचे साखर क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
साखरेला अांतरराष्ट्रीय पातळीवर यंदा उठाव नाही. निर्यात थंडावल्याने कारखान्यांकडे भांडवल नाही. परिणामी कारखान्यांनी उसाला एफआरपी दर देण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कारखान्यांना काहीसा दिलासा देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. त्यानुसार कच्चा साखरेच्या निर्यातीला प्रति टन हजार रुपये मदत देण्यात येणार अाहे. यासाठी शासनावर ८० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या ८० कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर मदतीमधून कारखान्यांनी शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ फरकाची रक्कम चुकती करावी. तसेच कारखान्याकडील सरकारची येणे असलेली रक्कमही वजा करण्यात येणार अाहे. १५ आॅक्टोबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीतील कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी ही मदत असून या निर्णयामुळे लाख मेट्रिक टन कच्ची साखर निर्यात होऊ शकते, असा दावा राज्य शासनाने केला आहे.

निर्णयास विलंब
कच्च्या साखरेच्या निर्यातीपूर्वी कारखान्यांना आंतरराष्ट्रीय बाजारातून आॅर्डर मिळवावी लागते. सध्या राज्यातील १६३ कारखान्यांनी गाळप बंद केले असून १६ कारखाने चालू आहेत. त्यामुळे ‍विलंबाने घेतलेल्या या निर्णयाचा कारखान्यांना काहीही लाभ होणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक संजीव बाबर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...