आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रश्नांबाबत विनंती एके विनंती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासमवेत राज्यातील साखर कारखानदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी भेट घेतली. मात्र, कारखानदारीच्या मदतीसाठी प्रश्नाचे गाठोडे घेऊन गेलेल्या कारखानदाराच्या शिष्टमंडळाच्या हाती विशेष काही लागले नाही. कारखान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल, त्याबाबत राज्य शासनामार्फत पाठपुरावा करण्यात येईल, या आश्वासनाच्या पलीकडे सह्याद्री अतिगृहावर झालेल्या या प्रदीर्घ बैठकीतून काहीच िनष्पन्न झाले नाही.

बैठकीस सहकारमंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, साखर संघाचे संचालक शिवाजी पाटील-नागवडे, उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांच्या समस्या लक्षात घेता साखर कारखान्यांच्या प्रश्नांवर सहकार विभागाचे प्रधान सचिव साखर आयुक्त यांनी सविस्तर प्रस्ताव तयार करावा. तो राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठविला जाईल. त्याचबरोबर साखर कारखान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारला विनंती करेल. त्याचा पाठपुरावाही करण्यात येईल. बैठकीच्या सुरुवातीस शरद पवार राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील साखर उद्योगाच्या कर्जाची पुनर्रचना करणे, हंगाम २०१५-१६ २०१६-१७ या कालावधीसाठी ऊस खरेदी करामध्ये माफी मिळणे, सहवीज निर्मिती प्रकल्पाचे वीज खरेदी करार करणे, शासकीय देणी प्रलंबित ठेवणे, शासकीय विनाअट थकहमी मिळणे, सॉफ्ट लोन मिळणे, इथेनॉल वरील अबकारी कर रद्द करणे आदी प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. साखर उद्योगांच्या या सर्व प्रश्नांबाबत शासन सकारात्मक विचार करेल. तसेच जे प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित आहेत, ते प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल. तसेच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी राज्य शासनामार्फत आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील साखर कारखान्यांविषयीच्या समस्यांविषयी चर्चा केली.

दुष्काळी िजल्ह्याचा स्वतंत्र ऊस आराखडा
राज्यात उद््भवणाऱ्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी उसाच्या पिकासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा वापर करता येईल किंवा यासाठी एक स्वतंत्र मॉडेल तयार करण्यात येईल. हे मॉडेल शासन, साखर कारखाने शेतकरी यांच्या समन्वयाने तयार करण्यात येईल. त्याचबरोबर दुष्काळी जिल्ह्यांसाठी वेगळा ऊस आराखडा तयार करण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच सहवीज प्रकल्पाची वीज खरेदीबाबत विचार केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...