आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात यंदा बाॅयलर नाही पेटणार; उसाचा तुटवडा, कारखाने हवालदिल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंंबई- मागच्या वर्षीच्या भीषण दुष्काळाने मराठवाड्यात अत्यल्प ऊस लागवड झाली. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी खोडवा काढून टाकला, जो खोडवा आहे त्यात काही राम नाही. परिणामी मराठवाड्यातील ६४ साखर कारखान्यांचे बाॅयलर यंदा थंड राहण्याची दाट शक्यता अाहे, त्यामुळे या भागातील कारखानदार हादरले अाहेत.

साखर कारखानदारीचे िवविध प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यामध्ये मराठवाड्यातील साखर कारखानदारीचे दुखणेही मांडले जाणार आहे.

राज्यात मागच्या वर्षी १७८ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यात मराठवाड्यातील ४० कारखान्यांचा समावेश होता. भीषण दुष्काळाने गेल्या वर्षी मराठवाड्याचे ऊस क्षेत्र झपाट्याने घटले. पाण्याचे साठे केवळ पिण्यासाठीच आरक्षित करण्यात आले होते. त्यामुळे या भागात कमालीची ऊस टंचाई िनर्माण होणार आहे. गळीत हंगाम परवडण्यासाठी कारखाना िकमान १६० िदवस चालला पाहिजे. यंदा गाळप करू इच्छिणाऱ्या कारखान्यांसाठी तेवढा ऊसच मराठवाड्यातील शेतात उभा नाही. त्यामुळे हंगाम कसा घ्यायचा, असा प्रश्न सहकारी अाणि खासगी साखर कारखान्यांसमोर सध्या उभा आहे.

एक किलो साखर बनवण्यासाठी ३३ रुपये खर्च येतो. यंदा किमती घसरल्याने कारखान्यांना साखर ३१ रुपयांत िवकावी लागली. सध्या साखरेचे दर किंचित वाढले आहेत, मात्र केंद्र सरकारने निर्यातशुल्क लादून साखर साठ्याची मर्यादा लावली आहे. त्यामुळे साखर कारखाने पुन्हा अडचणीत आले आहेत.

उसाअभावी यंदा मराठवाड्यातील केवळ दहा ते बारा कारखाने गाळप हंगाम घेऊ शकतील. तसेच मराठवाड्यातला यंदा गाळप हंगाम केवळ ६० ते ७० िदवस चालणार आहे. पूर्ण क्षमतेने गाळप नाही झाला तर मुदत कर्जाचे हप्ते कारखाने फेडू शकणार नाहीत. तसेच बंद राहिलेले कारखाने आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकणार नाहीत, असे साखर संघाचे कार्यकारी संचालक संजीव बाबर यांनी सांगितले.

समितीची बैठकच नाही
राज्यात गाळप हंगाम आॅक्टोबर ते मे दरम्यान घेतला जातो. यंदाच्या गाळपाच्या िनयोजनाची मंत्री समितीची बैठक अद्याप झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामाचे चित्र अस्पष्ट आहे. शरद पवार कारखान्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील मुद्दा असणार अाहे, अशी माहिती राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...