आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर उत्पादनाचा गोडवा घटला; चालू हंगामात 3.23 टक्के घट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विपणन वर्ष 2013-14च्या ऑक्टोबर ते सप्टेंबर या हंगामामध्ये देशातील साखर उत्पादन 3.23 टक्क्यांनी घसरून 29.3 दशलक्ष टनांवर आले आहे. प्रमुख राज्यांतील उत्पादन कमी झाल्यामुळे साखर उत्पादनाचे प्रमाण घटल्याचे 15 मेपर्यंतची आकडेवारी सांगते.

त्या अगोदरच्या वर्षात याच कालावधीत 24.7 दशलक्ष टन साखर उत्पादन झाल्याचे इंडियन शुगर मिल असोसिएशन या संस्थेने म्हटले आहे. 2013-14 वर्षात 24.2 दशलक्ष टन साखरचे उत्पादन झाले असून त्या अगोदरच्या वर्षातल्या 25.1 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत प्रमाण कमी असल्याचे ‘इस्मा’ने म्हटले आहे.

चालू वर्षात उत्तर प्रदेश, तामिळनाडूतील साखर उत्पादनाचा गोडवा कमी झाला असून कर्नाटकात मात्र सर्वाधिक उत्पादन झाले आहे. त्याउलट महाराष्ट्रात जवळपास मागील वर्षाइतकेच साखर उत्पादन झाले आहे. मागील वर्षातल्या याच कालावधीतील उत्पादनाशी तुलना करता उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन जवळपास दहा लाख टनांनी, तर तामिळनाडूतील उत्पादन 4.5 लाख टनांनी कमी झाले आहे. महाराष्ट्रातील उत्पादन स्थिर आहे.

साखर उत्पादनाची 15 मेपर्यंतची राज्यनिहाय स्थिती
> महाराष्ट्र : 77 लाख टन
> उत्तर प्रदेश : 64.5 लाख टन
> कर्नाटक : 41 लाख टन
> तामिळनाडू : 11.5 लाख टन

निर्यातीची गती मंदावली
खाद्य मंत्रालयाने साखर निर्यातीसाठी देण्यात येणारी सवलत प्रतिटनामागे कमी करून ती 3,300 रुपयांवरून 2,277 रुपयांवर आणली आहे. त्याचा परिणाम म्हणून साखर निर्यातीची गतीदेखील मंदावली आहे.