आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sugarcane Dry Up Marathwada, Water Expert Rajendra Singh View

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उसामुळे मराठवाडा काेरडा, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील एकाही गावात १९५७ मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष नव्हते. आता सुमारे २२ हजार गावांत ते आहे. पाण्याचा अति उपसा झाल्याने ही वेळ आली. जास्त पैसे मिळतात म्हणून पाणी खाणा-याऊस उत्पादनाकडे राजकारण्यांनी नजर वळवल्याने विदर्भ-मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले, असे परखड मत मॅगसेसे पुरस्कारप्राप्त प्रख्यात जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी शनिवारी व्यक्त केले.

मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे शनिवारी राजेंद्र सिंह यांच्याशी या विषयावर वार्तालाप झाला. अध्यक्ष चंदन शिरवाळे व कार्यवाह चंद्रकांत शिंदे यांनी सिंह यांचे स्वागत केले. पीक पद्धतीत बदलासाठी नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. दुष्काळी पट्ट्यात ऊस लागवड नकोच. उसाला पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन क्षारपड होण्याचा धोका आहे. त्याचाही विचार व्हावा. शेती व उद्योगांचा विचार करून पाण्याचे नियोजन न झाल्यास राज्याची स्थिती वाळवंटी राजस्थानसारखी होण्यास वेळ लागणार नाही, असा धोका व्यक्त करून देशात सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात असूनही गाळापायी पावसाचे पाणी झिरपण्याची प्रक्रियाच थांबली आहे, असे सिंह
म्हणाले.

हजार फूट खोदले तरी पाणी नसेल : लोणीकर
सध्या मराठवाड्याची सरासरी भूजल पातळी ३०० ते ७०० फुटांपेक्षा जास्त खोलीवर गेली आहे. अशाच पद्धतीने पुढेही उपसा सुरू राहिला तर आणखी पाच वर्षांनी एक हजार फुटांवरही पाणी मिळणार नाही, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शनिवारी दिला. भूजल प्राधिकरण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे शनिवारी अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा झाली. या वेळी लोणीकर यांनी जलपुनर्भरणाकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनही केले. १५ ते २० फुटांवर काळा पाषाण लागत असल्याने पाणी मुरत नाही, असे सांगून, पाण्यासाठी सर्व विभागांचा निधी वापरावा, असेही ते म्हणाले.