आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्याग्रस्त शेतकरी वारसांना एसटीत नोकरी, सरकारी कार्यालयांत आरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसासह नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या मुलांना एसटीच्या नोकरभरतीत प्राधान्य दिले जाईल. शिवाय सरकारच्या सर्व विभागांत असे आरक्षण देण्याचाही सरकारचा विचार असून, मुख्य सचिवांकडे तसा प्रस्ताव पाठवला जाईल. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली.

रावते म्हणाले, शासनाच्या क संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील भरतीत विविध प्रवर्गांना आरक्षण आहे. एसटी भरतीत लिपीक पदासाठी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

शपथपत्र बंधनकारक
एसटीत ७६३० चालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. चालकांना तंबाखू, दारू इत्यादी नशापान करणार नसल्याचे शपथपत्र दिल्याशिवाय नोकरीवर रुजू करून घेतले जाणार नाही, असेही रावते यांनी सांगितले.