आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sujit Singh From Osmanabad Will Be BJP's State President

उस्मानाबादचे सुजितसिंह ठाकूर भाजपचे प्रदेशाध्यक्ष?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने रिक्त झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आधी चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्याचा विचार झाला होता; पण उत्तम संघटक असलेल्या पाटील यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश झाल्याने नव्या चेह-याच्या शोधात असलेल्या भाजप पक्षश्रेष्ठींकडून उस्मानाबादच्या सुजितसिंह ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची सूत्रांची माहिती आहे. शनिवारी येथे झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही प्रदेशाध्यक्षपदाविषयी चर्चा झाली.

फडणवीस यांच्यासह एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचा समावेश असलेल्या कोअर कमिटीने प्रदेशाध्यक्षपदासाठी काही नावांची चर्चा केली. त्यात ठाकूर यांचे नाव आघाडीवर होते. भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष असलेल्या ठाकूर यांनी पक्षसंघटनेसाठी प्रभावी कामगिरी केली असून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विश्वासातील ते संघटक होते. सध्या ठाकूर यांच्याकडे राज्य भाजपच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी आहे.

मंत्रिमंडळाचाही लवकरच विस्तार
कोअर कमिटीच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलही मते जाणून घेण्यात आली. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणे गरजेचे असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. दहा मंत्र्यांच्या जोरावर अधिवेशनाला सामोरे जाणे कठीण होऊन बसेल. त्यामुळे दहाएक दिवसांत तो विस्तार व्हावा. यामुळे नव्या मंत्र्यांना आपल्या खात्याची थोडीबहुत माहिती घेणे सोपे होऊन जाईल, असे सांगितले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच प्रदेशाध्यक्ष यावर शिक्कामोर्तब होईल, असे समजते.