आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मग खरे शेतकरी रेशीमबागेत शाेधायचे का? मुख्यमंत्र्यांच्‍या टीकेला सुकाणू समितीने दिले उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘भाजप प्रदेश कार्यकारिणीतील भाषणात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला त्रागा अनाठायी असून यातून  प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी धोरणे बदलावी लागतील’,  असे प्रत्युत्तर शेतकरी सुकाणू समितीचे समन्वयक डाॅ. अजित नवले यांनी दिले. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी धोरणे राबविणारे खरे देशद्रोही आहेत. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्याऐवजी ब्रिटिशांची भलावण करणाऱ्या संघटनांना गुरुस्थानी मानणाऱ्यांनी शेतकऱ्यांना देशभक्ती शिकवू नये.  खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ व्हावा म्हणून अटी शर्थी असतील व त्यामुळे नियमित कर्ज भरणारे, सावकार, पतसंस्थांकडून कर्ज घेणारे, सिंचन, पाॅलीहाऊस व शेडनेट यासाठी कर्ज घेणारे वंचित राहणार असतील तर खरे शेतकरी ‘नागपूरच्या रेशीम बागेत’ शोधायचे का?’, असा सवालही नवले यांनी केला.    
 
शेतकरी कर्जमाफीची मागणी अराजक पसरवणारी असेल तर विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्रीही अशीच मागणी करत होते. त्यावेळी ते अराजक पसरवत होते काय? असे मी त्यांना विचारतो. शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी म्हणजे देशद्रोह व  अराजक, मग काॅर्पोरेट कंपन्यांची करमाफी, कर्जमाफी म्हणजे देशप्रेम व सुशासन हा कुठला न्याय?’, असा प्रश्नही नवले यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.  

काम झेपत नसल्याने माॅनिटरची चिडचिड : मलिक   
वर्गाच्या माॅनिटरला काम झेपत नाही, हे लक्षात आले की तो जशी चिडचिड करतो, असे मुख्यमंत्री करू लागले आहेत. त्यांना आता कामावर लक्ष केंद्रित करावे, तरच त्यांचे नैराश्य जाईल. त्यांची निराशा आता इतक्या टोकावर गेली आहे की मीडियावरही आगपाखड करू लागले आहेत. कर्जमाफी जाहीर करून दोन महिने होत आलेत, पण तरीही काही होत नाही. यावर मीडिया प्रश्न उपस्थित करणार असेल अाणि त्याला दुकानदारी म्हणण्याइतपत फडणवीस यांची मजल जात असेल तर त्यांचा तोल गेला आहे, असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
 
बातम्या आणखी आहेत...