आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध जिल्ह्यात \'सुकाणू\'च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु; पुणे, बीडमधील कार्यकर्ते ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध जिल्ह्यात सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. - Divya Marathi
विविध जिल्ह्यात सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे.
मुंबई/पुणे- सुकाणू समितीने सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन छेडले आहे. संपूर्ण शेतकरी कर्जमाफी न दिल्याने, पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु न देण्याचा इशारा सुकाणू समितीने दिला होता.
 
त्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. अहमदनगर, पुणे, बीड, कोल्हापूर अशा जिल्ह्यात सुकाणू समितीचे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहेत.
 
अहमदनगरमध्ये ध्वजारोहणाआधीच प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुकाणू समितीचे निमंत्रक अजित नवलेंसह कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. तर कोल्हापुरात शेतकरी संघटनेच्या 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यात साधू वासवानी चौकात सुकाणू समितीच्या वतीनं बाबा आढाव यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण होण्याऐवजी एखादा शेतकरी किंवा शहीद पत्नीच्या हस्ते व्हावा, अशी मागणी केली गेली. परभणीत शेतकरी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांवर झेंडावंदनादरम्यान सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...