आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाजाचा ‘एसटी’त समावेश करावा : महाजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘धनगर समाज गेली साठ वर्षे उपेक्षित राहिला आहे. या समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गात समावेश करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे’ अशी अपेक्षा लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केली.

चर्चगेट शेजारी उभारण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या अर्धपुतळ्याचे रविवारी त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी आपल्या भाषणात महाजन यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास कथन केला. तसेच धनगर समाजाने इतिहासात बजावलेल्या कर्तृत्वाची माहितीही सांगितली. राज्य शासनाने धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची शिफारस केल्यास केंद्र सरकार पुढील कार्य तत्परतेने करेल, असे आश्वासन देत राज्यात महायुतीचे सरकार धनगर समाजाच्या प्रश्नांची तड लावेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास भाजप आमदार राम शिंदे, आमदार प्रकाश शेंडगे, माजी आमदार रमेश शेंडगे, आमदार अ‍ॅड. आशिष शेलार आदी उपस्थित होते.