आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SPL: लतादीदींच्या इच्छेमुळे काँग्रेसचा जळफळाट, चव्हाणांचा पवारांवर \'बाण\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सध्या दिवाळी सुरु आहे व सर्व जण सणासुदीच्या मूडमध्ये असून, घरी राहून आपल्या कुटुंबियासोबत सुटी घालवत आहेत. त्यामुळे रूचकर व गोड फराळावर आपल्या घरच्या व्यक्तींसोबत तो आनंद साजरा करीत आहे. मात्र, मागील आठवड्यात भारताने सलग दोन एकदिवसीय सामने जिंकून सात सामन्याची मालिका 3-2 अशी खिशात घातली. शेवटच्या दोन सामन्यात दोन्ही संघातील चौकार षटकारांची आतषबाजी करीत क्रिकेटरसिकांचा दिवाळीतील आनंद द्विगुणित केला. खासकरून रोहित शर्मा, विराट कोहली व शिखर धवन यांना रसिकांनी डोक्यावर घेतले. कारण या त्रिकुटाने कामगिरीच अशी भन्नाट केली आहे.
याचबरोबर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी पुण्यात पुन्हा हजेरी लावली. तसेच आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत काँग्रेसला लक्ष्य केले. यावेळी लतादीदींनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी जाहीर पाठिंबा दिला. यावरून गहजब झाला. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री चव्हाण यांनी शरद पवारांवर आणखी एक तिरकस कॉमेंट केली. शरद पवार लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत असले तरी त्यांचे निकटवर्तीय त्यांना निवडणूक लढविण्यास भाग पाडतील व ते पुन्हा लोकसभेत येतील, असे भाष्य करून पवारांचा नकार म्हणजे होकार असे सांगून खळबळ उडवून दिली. याचबरोबर मुंबई-पुण्यातील लाखो प्रवाशांना रोज ने-आण करणा-या बेस्ट व पीएमपीच्या कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस न दिल्याने त्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या आणि इतर घडामोडी आपण वाचणार आहोत पुढील स्लाईडमध्ये......