आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suneel Tatkare Again Absent Irrigation Scam Probe

सिंचन घोटाळा : एसीबीच्‍या कार्यालयात सुनील तटकरे हजर, झाली चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनील तटकरे - Divya Marathi
सुनील तटकरे
मुंबई - सिंचन घोटाळा प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो (ACB) ने माजी उपमुख्‍यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधातही फास आवळायला सुरुवात केली आहे. या दोघांनाही एसीबीने यापूर्वी समन्स पाठवली होती. दरम्‍यान, आज (मंगळवार) तटकरेंना एसीबीने आपल्‍या मुख्‍यालयात चौकशीसाठी बोलावून घेतले. दुपारी 12 च्या सुमारास तटकरे दाखल झालेत. पण, या चौकशीतून नेमके काय समोर आले, याची माहिती मिळू शकली नाही.
एसीबीने 8 जून रोजी छगन भुजबळ त्यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्यासह बांधकाम विभागातील काही अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले होते. महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी एसीबीने दोन संस्था आणि 6 अभियंत्याच्या विरोधात 1600 कोटींच्या सिंचन घोटाळाप्रकणी गुन्हे दाखल केले होते.

एसीबीने यापूर्वी 10 मे रोजी या तटकरे आणि पवार यांना समन्स पाठवले होते. सिंचन घोटाळ्या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी त्या दोघांना हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पण, त्या दोघांनी ते अमान्य केले होते. त्यानंतर त्यांना लेखी स्वरुपात म्हणणे मांडण्याची परवानगी देण्यात आली होती.
पुढे वाचा, का बोलावले तटकरेंना.....