आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिसासाठी लाचखोरी; सुनील केसरी अटकेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतातील व्हिसाची मुदत वाढवून देण्यासाठी परदेशी व्यक्ती व केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिका-यांमध्ये ‘व्यवहार’ घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा ट्रॅव्हल्सचा एजंट सुनील केसरी याला सीबीआयच्या पथकाने अटक केली आहे.
परदेशी नागरिकांना व्हिसा मिळवून देण्यासाठी प्रत्येकी 15 हजारांची लाच घेतली जात असल्याच्या तक्रारी सीबीआयकडे आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी सीबीआयच्या पथकाने सापळा रचला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या विदेशी विभागाचा एक अधिकारी पी. के. सिंग याला नुकतेच 15 हजारांची लाच घेताना अटक केली होती. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीनंतर, या कामी परदेशी नागरिकांकडून पैसे घेण्याच्या व्यवहारात सुनील केसरी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने सुनील केसरीला अटक केली. तसेच त्याच्या कार्यालयाचीही झाडाझडती घेऊन कागदपत्रे जप्त केली.