आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ मॉडेलला पारसकरांनी बहीण मानले होते- वकिलाचा कोर्टात दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- सुनील पारसकर)
मुंबई- मुंबईतील आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांच्यावर बलात्काराचे आरोप करणार्‍या मॉडेल तरुणीला पारसकर यांनी बहिणीचा दर्जा दिला होता, असा युक्तिवाद पारसकर यांचे वकिल रिझवान मर्चंट यांनी सेशन कोर्टात केला आहे. याचा पुरावा म्हणून मर्चंट यांनी पारसकर यांनी संबंधित मॉडेलला पाठवलेले मेल कोर्टात सादर केले. दरम्यान, आज पारसकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे. त्यापूर्वी सरकारी वकील कल्पना चव्हाण या पोलिसांची बाजू मांडून सर्वपक्षीयांचे म्हणणे कोर्टात आपली मत मांडतील.
पारसकर यांचे वकिल रिझवान मर्चंट सेशन कोर्टात मागील दोन दिवस युक्तीवाद सादर केला. यावेळी मर्चंट यांनी पारसकर आणि मर्चंट यांचे संबंध कसे सलोख्याचे होते हे पुराव्यानिशी सांगण्याचा प्रयत्न केला. पारसकर हे संबंधित मॉडेलला बहीण मानत होते. हे त्यांनी तिला 27 जून रोजी पाठवलेल्या मेलमधून स्पष्ट होते असे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. पारसकर यांची ही वर्तणूक या दोघांमध्ये अत्यंत चांगले आणि सलोख्याचे संबंध होते हे दर्शविते, असा दावाही मर्चंट यांनी केला.
पारसकर यांना पाठविलेल्या अनेक मेलमध्ये मात्र संबंधित मॉडेलने पारसकर यांना ‘माय स्वीट हार्ट’, ‘माय फ्रेंड’ असे संबोधत असल्याचे पुरावे सादर केले. माझ्यावर झालेल्या बलात्कारासारख्या घटनेने मला मोठा मानसिक धक्का बसल्याने आपण प्रचंड तणावात होतो. मानहानी सहन करावी लागू नये व नैराश्यात असल्याने बलात्काराची तक्रार दाखल करण्यास आपल्याला उशीर झाला हे मॉडेल तरुणीचे म्हणणेही विसंगत असल्याचे मर्चंट यांनी कोर्टाला सांगितले.
तथाकथित बलात्काराच्या या घटनेनंतरदेखील ही मॉडेल लोकांना आकर्षित करणारे ट्विट ट्विटवर पाठवित होती. ‘कॅच मी इफ यू कॅन’ असे ट्विटरवर आवाहन करताना ती तिच्या फॅन्ससाठी सांताक्रुझ येथील ‘हयात’ हॉटेलचा पत्ताही दिल्याचे मर्चंट यांनी पुरावे सादर केले. नैराश्याच्या गर्तेत सापडलेली किंवा मानसिकदृष्ट्या खचलेली एखादी तरुणी विनयभंग अथवा बलात्कारासारख्या घटनेनंतर ‘हयात’ हॉटेलमध्ये पार्टीसाठी लोकांना बोलवेल काय, असा सवाल मर्चंट यांनी उपस्थित केला.