आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sunil Tatkare Claims That Irrigation In Maharashtra Increased

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्रिमंडळासमोर सिंचन सादरीकरण झालेच नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील सिंचन क्षेत्रात 10.5 लाख हेक्टर म्हणजेच 5.68 टक्के वाढ झाली असून कृषी विभागाने दिलेली 0.1 टक्के ही आकडेवारी चुकीची असल्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगितले. 0.1 टक्काच सिंचन झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत श्वेतपत्रिकेची घोषणा करणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अडचणीत आल्याने काँग्रेसच्या मंत्र्यांनी सिंचनाच्या सादरीकरणाबाबत तांत्रिक मुद्दे उपस्थित करून हे सादरीकरण होऊ दिले नाही.
तटकरे यांनी सुरुवातीला सिंचन क्षेत्रामध्ये झालेल्या वाढीची माहिती दिली. तसेच 12 हजार कोटी रुपये जमीन, पुनर्वसन आदींवर खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे सादरीकरण सर्व मंत्र्यांना वाटण्यात आले नाही. तसेच आक्षेप घेतलेले काहीच मुद्दे त्यामध्ये नाहीत, अशी कारणे देत काँग्रेसच्या मंत्र्यांनी तटकरे यांना सादरीकरण करण्यापासून थांबवले. मुख्यमंत्र्यांनी सिंचनाबाबत 1960 पासूनची माहिती देण्याऐवजी गेल्या दहा वर्षांत काय झाले त्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आणावी, असे सांगितले. जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनीही ज्या मुद्द्यांवर चर्चा होते ते सादरीकरणात उपस्थितच झाले नाहीत, असे सांगितले. त्यामुळे तटकरे यांना सादरीकरण थांबवून ते पुढच्या वेळी पुन्हा मंत्रिमंडळासमोर ठेवावे, असे सांगण्यात आले.
स्त्रीभ्रूण हत्येबाबत सीआयडी रिपोर्ट मागवा
स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी गृहमंत्र्यांनी अद्याप त्याचा सीआयडी अहवाल दिलेला नाही, अशी तक्रार आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी केली. या प्रकरणांमध्ये कोण दोषी आहे त्यांची नावे पुढे येऊ द्या. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले. त्यावर आबांनी बीडच्या पोलीस अधिकाºयांकडून माहिती घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.