आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेत्याला बोलावणे हास्यास्पद: तटकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य सरकारच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते आणि पत्रकारांनाही सहभागी करावे, या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे म्हणाले की, विरोधी पक्षनेते आणि पत्रकारांना कॅबिनेटच्या बैठकीत सहभागी करून घेण्याची मागणी हास्यास्पद आणि घटनाबाह्य आहे. 
 
महिनाभरापूर्वी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेने भाजप आणि शिवसेनेतील “महाभारत’ अनुभवले आणि आता त्यांच्या “बालबुद्धी’चे दर्शन होत आहे. मागील ३० वर्षांच्या इतिहासात प्रथमच राज्य सरकार १९० आमदारांच्या बहुमताने सत्तेत आले आहे. तरीसुद्धा ते दुबळे वाटत आहे. दरम्यान, २१ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, असेही त्यांनी म्हटले.
बातम्या आणखी आहेत...