आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NEWS @ MH: सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष? भास्कर जाधव पुन्हा मंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लोकसभेत दारूण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीने पक्षातंर्गत मोठे फेरबदल करण्याचे योजले आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याऐवजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची निवड निश्चित मानली जात आहे. भास्कर जाधवांकडून प्रदेशाध्यक्षपद काढून त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा पाठविले जाणार आहे. तर, तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदासोबत मंत्रिपदही ठेवण्यात येईल. भास्कर जाधव यांच्या कार्यशैलीबाबत आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांकडे तक्रारी केल्यानंतर व सद्य राजकीय परस्थिती लक्षात घेत वरील बदल करण्यात येणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी अथवा गुरुवारी होण्याची शक्यता आहे.
पुढे वाचा, नगर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांचा राजीनामा...