आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमची आघाडी काँग्रेससोबत, मात्र जागा निम्म्या हव्यातच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आमची आघाडी कायम राहणार आहे. मात्र, 288 पैकी निम्म्या म्हणजे 148 जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात लोकसभेतील यशाच्या मोजमापाची पट्टी लावत काँग्रेसने 174 जागा घेतल्या होत्या. आता मोजमाप करण्याची पट्टी बदलली आहे. लोकसभेत राष्ट्रवादीला काँगे्रेसपेक्षा जास्त यश मिळाले असल्याने आम्हाला जागा वाढवून हव्यातच,’ असा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी केला.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आघाडीत ज्यांच्या जास्त जागा निवडून येणार त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र जसे ठरले आहे, तसेच लोकसभेतील यशावरही जागावाटप व्हायला हवे, असाही निर्णय झाला होता, हे काँग्रेसने विसरू नये,’ हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच तटकरेंनी राज्यभर मेळावे आयोजित केले असून त्याची सुरुवात पालघरपासून झाली. आता 4 जुलैला नगरला, 5 जुलैला कल्याण- डोंबिवलीत, तर 6 जुलैला जळगावात मेळावे होतील.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माध्यमांसमोर आपली मागणी मांडण्यापेक्षा काँग्रस नेत्यांसोबत जागावाटपाची चर्चा करावी, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले.

(फोटो - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे )