आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनीने व्हिडिओ पोस्ट करून राम गोपाल वर्मा यांना दिले सडेतोड प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जागतिक महिला दिनी सनी लियोनीसंदर्भात वादग्रस्त 'ट्वीट' करणे दिग्दर्शक रामू अर्थात राम गोपाल वर्मा यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. समाजसेविका विशाखा महांबरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोवा पोलिसांनी रामू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामू यांनी माफी न मागितल्यास 'जोडे मारा आंदोलन' करण्‍यात येईल, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

दुसरीकडे, खुद्द सनी लियोनी हिने आता या प्रकरणात उडी घेतली आहे. तिने एक व्हिडिओ पोस्ट करून राम गोपाल वर्मा यांना सडेतोड उत्तर दिले आहे. सनीने 'ट्विटर'वर व्हिडिओ शेअर करून महिलांच्या परिवर्तनासंदर्भात बोलताना शब्दांचा विचारपूर्वक वापर करावा, असा सल्ला रामूला दिला आहे.

ड्रामा क्वीन राखी सावंतची रामूला साथ...
महिलांनी सनी लियोनीचा आदर्श घ्या, असा सल्ला देणार्‍या रामूवर सर्वत्र टिकेची झोड उठली असताना ड्रामा क्वीन राखी सावंत हिने मात्र रामूला साथ दिली आहे.  रामुच्या वक्तव्याशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचे राखीने म्हटले आहे.

'राम गोपाल वर्मा यांनी केलेले वक्तव्य योग्यच आहे. मी त्यांच्या बाजुने आहे. महिलांनी चूल आणि मुल सांभाळत असताना पतीला आकर्षित करण्याचे कोचिंग घ्यायला हवे. लग्नाला 20 वर्षे होतात. तरी एखादी हॉट तरुणी एका झटक्यात पतीचे लक्ष वेधून घेते. एका रात्रीत पत्नीचे 20 वर्षांचे प्रेम पती विसरुन जातो,' असे राखी सावंत हिने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण...?
8 मार्चला जागतिक महिला दिनी ‘सनी लिओनी जितका आनंद देते, तितकाच आनंद जगभरातील सर्व महिलांनी पुरुषांना द्यावा', असे राम गोपाल वर्मा यांनी ट्‍वीट केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रामूच्या ट्‍वीटवर आक्षेप घेतला. दोघांमध्ये ट्विटरयुद्ध सुरु झाले आहे. वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या वर्मांना माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरे जा, असा इशारा दिला आहे.

'तुम्हाला आई नाही का? असा सवाल करत कायदा हातात घेण्याचीही आमची तयारी आहे', असाही इशारा आव्हाड यांनी दिला आहे. त्यावर आता रामगोपाल वर्मा यांनी "आव्हाड यांच्यासारखा विदुषक दुसऱ्यांनी काय बोलायचे हे ठरवणार का?', असे ट्‍वीट केले आहे.  दरम्यान, राम गोपाल वर्मांच्या वादग्रस्त ट्वीटची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याने अनेकदा ट्वीट केले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अभिनेता टायगर श्रॉफबद्दल वादग्रस्त ट्वीट केले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 'ट्विटर'वर व्हिडिओ शेअर करून काय म्हणाली सनी लियोनी

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...