आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीवर चित्रित \'या\' जाहिरातीवर बंदीची मागणी, रिपाई महिला आघाडीचे आज आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनीची ही जाहिरात सुरुवातीपासून वादग्रस्त राहिली आहे. - Divya Marathi
सनीची ही जाहिरात सुरुवातीपासून वादग्रस्त राहिली आहे.
मुंबई - सनी लियोनीवर चित्रित मॅनफोर्स कंडोमच्या जाहिरातीवर बंदीची मागणी करण्यात आली आहे. रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीने ही जाहिरात अश्लील आणि बिभस्त असल्याचा आरोप केला आहे. जाहिरात बंदीसाठी मंगळावारी आंदोलन करण्यात येणार आहे. 
 
मॅनफोर्स कंडोमची जाहिरात अनैतिकतेचा कळस गाठणारी असल्याचा आरोप रिपाई (आठवले गट) महिला आघाडीच्या शीला गांगुर्डे यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, ही जाहिरात संपूर्ण महिला वर्गाचा अपमान करणारी आहे. लवकरात लवकर या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. 
 
काय आहे जाहिरातीत... 
एका जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या बोलांवर ही जाहिरात आहे. पूर्वाश्रमीची पोर्नस्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी या जाहिरातीत लाल साडीमध्ये दिसते. सनी लियोनी मॅनफोर्स ब्रँड अॅम्बेसिडर आहे.
 
या जाहिरातीवर तत्काळ बंदी घालण्यात यावी यासाठी रिपाई महिला आघाडी मंगळवारी मुंबईत आंदोलन करणार आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये, गोव्याच्या रणरागिनींनी केली होती ही मागणी... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...