आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sun's Lost Its Head, Pilots And High Flyers Beware Of X & Gamma Rays

प्रखर सूर्यकिरणांचा विमान प्रवाशांवर परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यापुढे विमान प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला सूर्यकिरणांपासून आपला बचाव कसा करता येईल, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण विमानातून प्रवास करणारे प्रवासी आणि चालक दलाच्या सदस्यांना सूर्याची प्रखर किरणे आजारी पाडू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. सूर्यनारायण सध्या गेल्या अकरा वर्षांतील त्याच्या प्रखर तीव्रतेवर आहेत. त्यापासून निघणार्‍या एक्स - रे आणि गामा किरणांचा मनुष्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

इंडियन सेंटर फॉर स्पेस फिजिक्सने डीजीसीएला (नागरिक उड्डाण महासंचालनालय) पत्र लिहून सौरचक्रामुळे होणार्‍या दुष्परिणामांबाबत सावध केले आहे. सेंटरचे प्रोफेसर संदीप चक्रवर्ती यांनी पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे की सौरचक्र संपण्याला अद्याप एक वर्षाचा कालावधी बाकी आहे. एप्रिल ते मे या कालावधीत सूर्याची किरणे अतिशय प्रखर होती. या काळात सूर्यापासून इतर सर्वसाधारण दिवसांपेक्षा जास्त घातक किरणे निघतात. सध्या सौरचक्राची ही केवळ सुरुवात आहे. या काळात विमान प्रवासी आणि पायलट, चालक दलाचे सदस्य तस़ेच इतरांना मेंदूशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात. त्याचबरोबर त्यांना शारीरिक, मानसिक व भावनात्मक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

भारतापेक्षा जास्त धोका कॅनडा व ध्रुवीय देशांना : या किरणांचा प्रभाव भारतात असून नसल्यासारखा असेल; परंतु कॅनडासह इतर ध्रुवीय देशांत त्याचा मोठा प्रभाव जाणवू शकतो. नेहरू तारांगणाचे प्रोग्राम समन्वयक सुहास नाईक यांनी सांगितले की, ‘या किरणांमुळे आजारी पडल्याची तक्रार नाही.

किरणांमुळे मज्जातंतूंचे नुकसान
प्रो. चक्रवर्ती यांनी सांगितले की, ही सूर्यकिरणे दीर्घकाळ परिणाम करत राहिली तर त्यापासून कॅन्सर होण्याचा धोकादेखील आहे. ही किरणे थेट नर्व्हस सिस्टिमवर (मज्जातंतू) परिणाम करतात. गर्भवती महिलांना त्यापासून जास्त धोका असतो. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल संस्थेचे तज्ज्ञ डॉ. मयंक वाहिया यांनी सांगितले की, ही किरणे धोकादायक आहेत; ती कमी कालावधीसाठीच निघतात. पण त्यामुळे आतापर्यंत एखाद्याची प्रकृती बिघडली असल्याचे वृत्त नाही.