आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादेत सनस्ट्रीम उभारणार स्मार्ट सिटी, ३ महिन्यांत भूसंपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीसोबतच राज्यात खासगी कंपन्यांच्या मदतीने स्मार्ट सिटी उभारण्याच्या योजनेअंतर्गत औरंगाबादनजीक शेंद्रा-बिडकीन परिसरात सनस्ट्रीम सिटी प्रा. लि. ही कंपनी ११ हजार ९०० कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी उभारणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी दिली.

डीएमआयसीमुळे औरंगाबाद येथील शेंद्रा-बिडकीनचे महत्त्व वाढले आहे. या ठिकाणी सनस्ट्रीम कंपनीने स्मार्ट सिटी उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार परवानगी देण्यात आली. यासाठी भूसंपादन तीन महिन्यांत पूर्ण केले जाणार असून कंपनी घटक एकात्मिक औद्योगिक शहराकरिता अर्ज करणार आहे. त्यानंतर राज्य सरकार यासंबंधी अधिसूचना काढणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

सांडपाण्यावर प्रक्रिया..
सध्या औरंगाबादसह राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांना वापरण्यास देण्याबाबत सरकार विचार करीत आहे. औरंगाबादमध्ये डीएमआयसीत उभारल्या जाणाऱ्या उद्योगांना औरंगाबादमधून निघणारे संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया करून वापरण्यास देण्याचा विचार असल्याचे देसाई म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...