आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावणेबारा तासांतच टॅल्गाेने कापले मुंबई- दिल्लीचे अंतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वेगवान टॅल्गोची अंतिम चाचणी यशस्वी झाली असून या गाडीने दिल्ली-मुंबई हे अंतर १२ तासांपेक्षाही कमी वेळेत पार केले. या रेल्वेचा प्रवास दिल्लीहून शनिवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झाला. ताशी १५० किलोमीटर वेगाने ११ तास ४८ मिनिटांत हे अंतर पार करत रविवारी पहाटे २ वाजून ३३ मिनिटांनी ती मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली. गेल्या चाचणीत ही गाडी निर्धारित वेळेपेक्षा १८ मिनिटे उशिराने पोहोचली होती. टॅल्गोच्या वेगाची चाचणी यशस्वी झाल्याने देशाचा वेगवान रेल्वेच्या दिशेचा महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे.

या गाडीमुळे वेगवान आणि आरामदायी गाड्यांनी प्रवास करण्याचे भारतीय प्रवाशांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. राजधानी एक्स्प्रेसने मुंबई दिल्ली हे १४०० कि.मी.चे अंतर कापण्यासाठी सुमारे १६ तास लागतात. हा प्रवास किमान चार तासांनी कमी करण्याचा भारतीय रेल्वेचा विचार आहे. त्यासाठी वेगवान टॅल्गो गाडीच्या वेगाच्या चाचण्या घेण्यात येत होत्या. ताशी २०० कि.मी. वेगाने धावणारी गाडी एप्रिलमध्ये मुंबईच्या बंदरावर आयात करण्यात आली.
टॅल्गोची पहिली चाचणी उत्तर प्रदेशातील बरेली - मुरादाबाद व त्यानंतर उत्तर- मध्य रेल्वेच्या पलवल- मथुरा पट्ट्यात दुसरी चाचणी झाली. दाेन ऑगस्टला िदल्ली- मुंबईदरम्यान झालेल्या टॅल्गाे ट्रेनच्या पहिल्या चाचणीमध्ये मुसळधार पावसामुळे गाडीचा वेग कमी करण्यात अाला हाेता. पहिली चाचणी ही इलेक्ट्रिक इंिजनाच्या साहाय्याने घेण्यात अाली हाेती. त्यानंतरच्या या मार्गावरील चाचणी िडझेल इंजिनाच्या मदतीने घेण्यात अाली. यापूर्वी सहा वेळा टॅल्गोची चाचणी घेण्यात आली. वेग आणि तांत्रिक निकष यशस्वी झाल्यानंतर या गाडीचे डबे खरेदी करण्याबाबत रेल्वे मंत्रालय विचार करणार आहे.

सध्याच्या टॅल्गाे गाडीचे दरवाजे रेल्वे फलाटापासून काही इंच खाली अाहेत. त्यामुळे देशातल्या फलाटाप्रमाणे या गाडीत अावश्यक बदल रेल्वे मंत्रालय सुचवणार आहे. त्यानंतर दाेन ते तीन वर्षांत टॅल्गाेच्या डब्यांचे उत्पादन सुरू करण्यात येणार अाहे.
टॅल्गोला नऊ डबे
टॅल्गो या स्पॅनिश कंपनीने बनवलेल्या या गाडीला ९ डबे असून ते वजनाने हलके आहेत. चाळीसच्या दशकात स्थापन झालेल्या या कंपनीने आता भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे. ३० टक्के विजेचा कमी वापर, हलके कोच आणि वळणावर वेग कमी करण्याची गरज नसलेले टॅल्गो २५० कोच भारतीय रुळांवर वापरले जाणार आहेत. भारतीय इंजिनला जोडून सध्या टॅल्गो ट्रेनची चाचणी सुरू आहे. टॅल्गो ट्रेनमध्ये दोन एक्झिक्युटिव्ह आणि चार चेअर कारचे कोच आहेत. याशिवाय खानपान व्यवस्थेसाठी स्वतंत्र कॅफेटेरियाचा कोचदेखील ट्रेनमध्ये असेल

पुढील स्‍लाइडवर वाचा, चाचणीत टॅल्गोची अाजवरची कामगिरी
बातम्या आणखी आहेत...