आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणीला जायकवाडीतून पाणी द्या; रावतेंचे अादेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी प्रकल्पाचे पाणी आवर्तन १ डिसेंबरपासून सुरू करण्यात यावे. या जिल्ह्यात रब्बी हंगामात पूर्ण कालवा क्षमतेने सिंचन करण्यात यावे. तसेच जायकवाडी प्रकल्पामधून उन्हाळी पिकांसाठी तीन आवर्तने देण्यात यावीत, अशा सूचना पालकमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी जायकवाडी पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या.

परभणी जिल्ह्यातील सिंचन व बिगर सिंचन आरक्षणाबाबत रावतेंच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आढावा बैठक झाली त्या वेळी ते बोलत होते. जुलै २०१७ पर्यंत परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या पाणी आरक्षणासही यावेळी मंजुरी देण्यात आली. जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामातून वाढलेला पाणी साठा व निम्न दुधना प्रकल्पातून उपलब्ध वाढीव पाणीसाठा यामुळे यावर्षी सिंचन क्षमता वाढविण्याची सूचनाही रावतेंनी केली. अतिवृष्टीमुळे कालव्यांचे नुकसान झाले आहे, गाळ साचला अाहे. कालवा स्वच्छ करण्यासाठी जलयुक्त शिवारासाठीची यंत्रसामुग्री जलसंपदा विभागास द्यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या. यावर्षी येलदरी धरणात असमाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे परभणी महापालिकेला येलदरी धरणाऐवजी निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याबाबत कार्यवाही करावी, असा निर्णयही या वेळी घेण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...