आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Supreme Court Declines Chhagan Bhujbal's Petition Against SIT

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौकशी टाळण्यासाठीचा खटाटोप ठरला व्यर्थच,भुजबळांची 'ईडी'मार्फतही चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी सोमवारी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीचे नेते तथा माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दणका दिला. भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एकवेळ एसआयटी चालेल, पण ‘ईडी’च्या (सक्त वसुली संचालनालय) चौकशीचा फेरा नको, यासाठी भुजबळांची धडपड होती. त्यासाठीच भुजबळांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. यामुळे ईडीच्या चौकशीतून सुटका करून घेण्यासाठी धडपडणारे भुजबळ अखेर त्यात अडकले आहेत, असा दावा आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी केला.

दमानिया यांनी बांधकाम विभागातील ११ भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भुजबळांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागची कंत्राटे देताना बेनामी कंपन्या स्थापन करून मनी लॉड्रींग करण्यात आले आहे, असे आरोप करताना दमानिया यांनी तशी कागदपत्रे कोर्टासमोर सादर केली आहेत. यासंदर्भात एसआयटीबरोबरच ‘ईडी’मार्फतही चौकशी झाली तर आपण या प्रकरणात अडकू, या भीतीपोटी भुजबळ यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला. यासाठी काही तासांसाठी लाखो रूपये फी आकारणरे ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. अभिषेक सिंघवीसारखे दिल्लीतील नामांकित वकील त्यांनी नेमले होते. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही.

हायकोर्टात अपील शक्य
सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर आता भुजबळांना पुन्हा हायकोर्टाकडे अपील करता येईल. तसेच ‘ईडी’ने भुजबळ तसेच त्यांच्या संबंधित कंपन्यांच्या संचालकांची चौकशी करून आपला अहवाल सादर केला, तरी त्यावर कारवाईचा लगेच निर्णय होणार नाही. या अहवालाविरोधातही भुजबळांना पुन्हा कोर्टात दाद मागता येईल.

छगन भुजबळांची प्रॉप्रर्टी २६५३ कोटींची : दमानिया
मिळालेल्या कागदपत्रांनुसार भुजबळांची २५६३ कोटी रुपयांची प्रॉपर्टी असून त्यात बंगले, फार्म हाऊस, हॅली पॅड, हॉटेल्स, जमिनी, कंपन्या अशा स्थावर तसेच जंगम मालमत्तेचा समावेश आहे. या सर्व मालमत्तेचे साता बारा तसेच फोटोग्राफ्स अँटी करप्शन विभागाकडे २० नोव्हेंबर आम्ही दिले आहेत,’ अशी माहिती दमानिया यांनी दिली.