आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता वाजवा रे वाजवा! ‘सायलेन्स झाेन’वर हायकाेर्टाच्या अादेशाला सुप्रीम काेर्टाची स्थगिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबईत १,५७३ ‘सायलेन्स झाेन’मध्ये उत्सवात लाऊडस्पीकर लावण्यास मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली हाेती. मात्र गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सर्वाेच्च न्यायालयाने हा अादेश रद्द केला. परिणामी मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत लाऊडस्पीकर व ढाेल-ताशांचा गजर निनादण्याचा मार्ग माेकळा झाला अाहे.

दरम्यान, मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्या. ए.एम. खानविलकर व न्या. डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने  या प्रकरणातील याचिकाकर्त्यांना नाेटीस बजावून दाेन अाठवड्यांत उत्तरही मागितले अाहे. ध्वनिप्रदूषणाविरुद्ध केंद्राने काही नियम लागू केले अाहेत. त्यात ‘सायलेन्स झाेन’मध्ये लाऊडस्पीकरला मनाई केली हाेती. मात्र नव्या नियमानुसार महाराष्ट्रात अजून सायलेन्स झाेन तयार करण्यात अालेले नसल्याचे सांगत राज्य सरकारने अाम्ही उत्सवादरम्यान निर्बंध लागू करू शकत नसल्याचे स्पष्ट केले हाेते. मात्र जाेपर्यंत नवे सायलेन्स झाेन सरकार तयार करत नाही ताेपर्यंत हायकाेर्टाच्या अादेशानुसार मुंबईतील १५७३ सायलेन्स झाेनमध्ये लाऊडस्पीकर लावण्यास मनाई केली हाेती. 
राज्य सरकारने घेतली होती सुप्रीम कोर्टात धाव
गणेशोत्सवाच्या परवानग्या नाकारल्यास ऐन उत्सवात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. याबाबतचे मूळ कायदे आणि नियम केंद्र सरकारने बनवले असल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे दाद मागितली. त्यावर केंद्र सरकारने 10 ऑगस्ट 2017 रोजी नियमात आवश्यक ते बदल करीत राज्य सरकार जाहीर करेल, तीच शांतता क्षेत्रे असतील, असे सांगितले होते. राज्य सरकारने कोर्टातकेला होता. राज्यात सध्या एकही ‘शांतता क्षेत्र’ नसल्याचे राज्य सरकारने कोर्टात सांगितले होते. या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च कोर्टात धाव घेतली होती.
 
ओक यांच्यावर केला होता पक्षपातीपणाचा आरोप
ध्वनिप्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने ऑगस्ट 2016 मध्ये दिलेल्या निकालामध्ये सुधारणा न झाल्यास कायदा सुव्यवस्थेची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. 100 मीटरच्या अंतरावर शाळा, हॉस्पिटल्स, न्यायालये असतील, तर ही क्षेत्रे शांतता क्षेत्र गणली जावीत, याप्रकारच्या आदेशामुळे लालबागचा राजा, गणेशगल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी यासारख्या अनेक गणेशोत्सव मंडळांना उत्सवच साजरे करता येणार नाही, ही वस्तुस्थिती समोर आल्यानेच राज्य सरकारने न्या. अभय ओक यांच्या पुढे यासंदर्भात सुरू असलेला खटला सुनावणीसाठी अन्य खंडपीठापुढे वर्ग करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपुढे केली होती. 
नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान ओक यांच्यावर थेट पक्षपातीपणाचा आरोप महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केल्याने एकच खळबळ उडाली होती.
 
 
ध्वनिप्रदूषणाच्या सर्व याचिकांची सुनावणी दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लूर यांनी ताबडतोब ही विनंती मान्य करत न्यायमूर्ती अभय ओक यांच्याकडून निर्देश येण्याआधीच ध्वनिप्रदूषणाच्या सर्व जनहित याचिका दुसऱ्या खंडपीठाकडे सुपूर्द करण्याचे आदेशही जारी करण्यात आले होते. तर याविरोधात एका माजी महाधिवक्त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी ही व्यक्त केली होती. 

काय आहे प्रकरण?
2016 च्या आदेशात न्यायालयाने शाळा, न्यायालये, धार्मिक ठिकाणे व रुग्णालये यांच्या आजूबाजूचा १०० मीटर परिसर ‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर केला. मात्र 10 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने अधिसूचना काढून ‘शांतता क्षेत्र’ जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला.  या अधिसूचनेच्या बळावर गेले दोन दिवस राज्य सरकार आपल्याला न्यायालयाचा 2016 चा आदेश मान्य नसल्याचे सांगत आहे. मात्र सरकारची ही भूमिका उच्च न्यायालयाला मान्य नाही.
राज्य सरकार जोपर्यंत ‘शांतता क्षेत्र’ अधिसूचित करत नाही, तोपर्यंत उच्च न्यायालयाचा आदेश पाळावा,’ असे न्या. अभय ओक यांनी सुनावणीत म्हटले होते.
 
सरकार पक्षाची बाजू
दहीहंडीदरम्यान मुंबईत केवळ दोनच ठिकाणी ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन झाले. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणूनही न्यायालयाने कौतुक न करता आदेशाचे पालन न केल्याबद्दल फटकारल्याचा राग सरकारच्या मनात होता. बुधवारच्या सुनावणीत अ‍ॅड. कुंभकोणी यांनी सरकारच्या चांगल्या कृतीची दखल कोणी घेत नाही, अशी नाराजी खंडपीठासमोर व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...