आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र सरकारला गोमांसप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नाेटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गोमांस प्रकरणात गोसेवा संघाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एका निर्णयात बाहेरच्या राज्यांतून गोमांस आणून येथे खाण्याला परवानगी दिली होती. त्याला अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाने आव्हाने दिले आहे. राज्यात गोमांसावर बंदी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ही बंदी उठवताना इतर राज्यांतून गोमांस आणून ते राज्यात विकण्याची परवानगी दिली होती. उच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले होते की, राज्यात गोमांसवरील बंदी कायम राहील. परंतु इतर राज्यांतून (जिथे गोमांस बंदी नाही) महाराष्ट्रात गोमांस आणले व खाल्ले जाऊ शकते. परंतु त्यांना प्रसंगी स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना सर्व पुरावे सोबत ठेवावे लागतील.
बातम्या आणखी आहेत...