आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Supports Bombay High Court\'s Order To Shift IPL Matches Out Of Drought hit Maharashtra

IPLचे सामने यंदा महाराष्ट्रात नाहीतच- सुप्रीम कोर्टाने MCAची याचिका फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे मुंबई इंडियन्स आणि पुणे संघाचे आयपीएलचे महाराष्ट्राबाहेर हलविण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणा-या मुंबई व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने हे सामने राज्याबाहेर हलविण्यात काहीच अडचण नाही असे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मुंबई व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसह मुंबई इंडियन्स व पुणे संघाला धक्का बसला आहे.
13 एप्रिल रोजी मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्रातील आयपीएलचे 30 एप्रिलनंतरचे सर्व सामने राज्याबाहेर हलविण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुंबई व पुणे संघाला बाहेरच्या राज्यातही सामने आयोजित करण्याबाबत अडथळे येत असल्याने राज्यातील या क्रिकेट संघटनांनी हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात गेल्या होत्या. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मात्र, मुंबई व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसह मुंबई इंडियन्स व पुणे संघाला कोणताही दिलासा मिळताना दिसला नाही.
मुंबई हायकोर्टाने दुष्काळप्रश्नी आयपीएलच्या भवितव्याबाबत झालेल्या सुनावणीत सामने राज्याबाहेर नेण्याचे आदेश बीसीसीआयला दिले होते. सामन्यांच्या आयोजनासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन हायकोर्टाने 15 दिवसांची मुदत दिली होती. राज्यातील पाण्याची कमतरता आणि दुष्काळी परिस्थिती पाहून हायकोर्टाने हा निर्णय घेतला होता. मात्र, बीसीसीआयने इतर राज्यात सामने घेण्याची तयारी सुरु केल्यानंतर तेथेही अडचणी येऊ लागल्या.
मुंबई संघाचा जयपूरमध्ये एक सामना होणार होता. मात्र, या राज्यातही दुष्काळ असताना मुंबईचे सामने जयपूरमध्येच का? इतर शहरात व राज्यात का नाही असा सवाल जयपूर हायकोर्टाने केला आहे. त्यामुळे मुंबई व पुणे संघापुढे आपले सामने कुठे होतील याची चिंता आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर बीसीसीआयला चांगलाच धक्का बसला आहे. बीसीसीआयला आता मुंबई व पुणे संघाचे इतर राज्यात आयोजित करावे लागणार आहेत. यासाठी केवळ चार-पाच दिवसाचा कालावधी उरला आहे.