आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी कायम; सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- शिवसेना नेते व राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची अामदारकी रद्द करण्याच्या अाैरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे खाेतकरांची अामदारकी तूर्त कायम राहिली अाहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणी हाेईल. 


सुप्रीम कोर्टात खोतकर यांच्या वतीने प्रख्यात वकील हरीश साळवे तर कैलास गोरंट्याल यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. 


जालना विधानसभेची २०१४ ची निवडणूक लढवताना खाेतकर यांनी उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी वेळ संपल्यानंतर अर्ज भरल्याचा अाराेप काँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी केला हाेता.  तसेच इतर कागदपत्रांतही त्रुटी होत्या. नंतर खाेतकरांनी निर्धारित वेळेनंतर फाॅर्म बदलला व अर्जावर मात्र अाधीची खाेटी वेळ टाकली, असा अाक्षेप याचिकेत हाेता. ताे ग्राह्य धरून खंडपीठाने खाेतकरंाची अामदारकी रद्द ठरवली हाेती.

 

अवलंबितांचा रकाना रिक्त
निवडणूक अर्ज भरताना अवलंबितांची (डिपेंडंट्स) माहिती भरण्यासाठी तीन रकाने असतात. त्यापैकी दोन रकाने खोतकर यांनी भरले होते. तर तिसरा रकाना त्यांनी पूर्णपणे कोरा सोडला होता. यामध्ये अवलंबित आहे किंवा नाही अशी माहिती भरावी लागत असते. पण हा रकाना रिक्तच ठेवण्यात आल्याने, ही त्रुटी देखील समोर आली होती.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...