आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळेंच्या परदेशी नागरिकत्वाबाबत काकडे यांच्याकडे नाहीत पुरावे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कृषिमंत्री शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांची सिंगापूरमध्ये स्थावर मालमत्ता व परदेशी नागरिकत्व असल्याचे आपल्याला माहिती आहे, पण माझ्याकडे सबळ पुरावे नाहीत, असे मृणालिनी काकडे यांनी गुरुवारी न्यायालयात सांगितले. सुळे यांच्या नागरिकत्वावर आक्षेप घेत लोकसभेवरील सुळे यांची निवड रद्द करावी अशी याचिका काकडे यांनी दाखल केली आहे.
या प्रकरणी न्या. जे. एच. भाटीया यांच्यासमोर सुनावणी कालपासून सुरू झाली असून, आजही ती सुरु राहणार आहे. काकडे यांची उलटतपासणी काल पूर्ण झाली. आज त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटची उलटतपासणी होईल. सुळे यांचे वकील मोहन जयकर यांनी काकडे यांची उलटतपासणी घेतली. त्यावेळी जयकर यांनी काकडे यांना उलटतपासणीत विचारले की, सुळे यांनी विदेशी कंपन्यांचे समभाग घेताना भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) परवानगी घेतली नव्हती. याचे पुरावे तुमच्याकडे आहे का. यावर काकडे यांनी माहितीच्या अधिकारात मिळालेला केवळ एकच कागदोपत्री पुरावा आपल्याकडे असल्याचे काकडे सांगितले.
सुळे यांचे विदेशी कंपन्यांचे समभाग घेतल्याची माहिती वेबसाइटवरुन घेतल्याचे काकडे यांनी याआधी सांगितले होते. भारतीय घटनेनुसार, एखाद्या भारतीय नागरिकाने परदेशात मालमत्ता घेतल्यास त्याचे येथील नागरिकत्व संपुष्टात येते, असे सांगणारा एकही कायदा नाही. सुळे सिंगापूरमधील कायद्याला बांधील आहेत की नाही, याचीही माहिती काकडे यांनी न्यायालयात सादर करावी, असे सांगण्यात आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे या परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या शिष्टमंडळाबरोबर सध्या पाकिस्तान दौरयावर आहेत. कालच भारतीय शिष्टमंडळाने पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांची भेट घेतली होती.
दुहेरी नागरिकत्त्वावरुन हायकोर्टाच्या निर्णयामुळे सुप्रिया सुळे अडचणीत