आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी’ची धुरा सुप्रिया सुळेंकडे? निवडणुकांसाठी प्रचारसभांचा धडाका लावल्याने चर्चेला ऊत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून प्रचारसभा, मेळावेे, सोशल मीडिया, पक्ष संघटनेच्या माध्यमातून अाक्रमक झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा चेहरा म्हणून समोर आणले जात आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे अाराेप असल्यामुळे राष्ट्रवादीची स्वच्छ प्रतिमा असलेला नेता म्हणून जनतेसमाेर जाण्यासाठी अजितदादांना बाजूला सारून पक्षाकडून सुप्रियांचे नेतृत्व पुढे केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात हाेत अाहे.

अागामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे सध्या राज्यव्यापी दाैऱ्यावर अाहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपविराेधात त्या जाहीरपणे अाक्रमक भाषणे करू लागल्या अाहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे भावी नेतृत्व त्यांच्याकडेच येणार असल्याच्या चर्चांना अाता ऊत अाला अाहे. त्यातच पक्षाध्यक्ष शरद पवारांशी जवळीक असलेल्या एका वर्तमानपत्रातही याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यामुळे या चर्चांना अधिकच वेग येत अाहे.

पक्षाचे विधिमंडळातील गटनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सिंचन घाेटाळ्यात भ्रष्टाचाराचे अाराेप अाहेत. माजी मंत्री छगन भुजबळ, अामदार रमेश कदम हे पक्षाचे नेते भ्रष्टाचाराच्या अाराेपावरून तुरुंगात अाहेत. त्यापाठाेपाठ अजित पवार व तटकरेंनाही काेणत्याही क्षणी अटक हाेण्याची शक्यता अाहे.त्यामुळेच अाता सुप्रियांचा चेहरा पक्षाकडून पुढे केला जात असल्याची चर्चा अाहे. माजी उपमुख्यमंत्री अार. अार. पाटील हे पक्षातील सर्वमान्य चेहरा हाेते. त्यांच्या निधनाने राज्यपातळीवर नेतृत्वाची पक्षात माेठी पाेकळी निर्माण झाली.

जयंतराव, वळसेंची नावे मागे
अाबांपाठाेपाठ जयंत पाटील व िदलीप वळसे पाटील यांचे नाव घेतले जात असले तरी हे चेहरे सर्वमान्य हाेऊ शकत नाहीत. छगन भुजबळ हे अाक्रमक नेतृत्व पक्षात अाहे, मात्र भ्रष्टाचाराच्या अाराेपामुळे तुरुंगात अडकल्यामुळे त्यांचीही प्रतिमाही मलिन झाली अाहे. त्यामुळे अाता सुळेंच्यात नावाची चर्चा अाहे. राज्यात सभा, मेळावे तसेच पक्षांंच्या बैठकांचा धडका लावत राष्ट्रवादीला उभारी देण्याची ताकद सुळे यांच्यात असल्याचे पक्षाकडून दाखवले जात आहे. मुख्य म्हणजे बारामतीमधून खासदार झाल्यानंतरही पक्षाच्या मुख्य प्रवाहात कधीही सामील न झालेल्या सुप्रिया यांनीही अाता अापण सध्याचा पक्षाचा प्रमुख चेहरा असल्याचे मान्य केले आहे.
बातम्या आणखी आहेत...