मुंबई - सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया मावळ दौऱ्यापासून चर्चेत आहेत. आज (गुरुवार) सुप्रिया सुळे यांनी, धमक्यांना घाबरत नसल्याचे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांना दिले आहे. सुळेंच्या शाब्दिक हल्ल्यानंतर फडणवीस म्हणाले होते, 'विरोधकांच्या कुंडल्या आमच्या हातात आहे, योग्य अस्त्र योग्य वेळी बाहेर काढू'.
काय-काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी विविध प्रश्नांवरुन थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल सुरु केला आहे. मावळमध्ये 'मुख्यमंत्रीपद झेपत नाही' असे म्हणत फडणवीसांची खिल्ली उडवली. नाशिकमध्ये कोपर्डीवरुन आक्रमक होत, 'आरोपपत्र दाखल करा अन्यथा राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल' असा पवित्रा घेतला. कांदा परिषदेत 'काळ्या मातीशी गद्दारी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा', अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. राष्ट्रवादीच्या या महिला नेत्याकडून मुख्यमंत्र्यांवर एकानंतर एक हल्ले होत असताना सरकारमधील कोणीच पुढे येऊन त्यांना उत्तर देत नाही अशी परिस्थिती गेल्या दोन-तीन दिवसांत दिसली त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या कुंडल्या आमच्या हातात आहे, योग्य अस्त्र योग्य वेळी बाहेर काढू' असा गर्भित इशारा दिला. हा इशारा न जुमानता सुप्रिया सुळेंनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत, तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही, आता सरकारवरच 302 अर्थात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, शिवसेनेला काय इशारा दिला...