आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र - आत्‍महत्‍या प्रकरण : सूरज परमार यांच्‍या मुलाला धमकीचा फोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्‍या आत्महत्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असताना परमार यांचा मुलगा अभिषेक याला एका अज्ञात व्‍यक्‍तीने फोन करून धमकी दिली असल्‍याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सूरज परमार आत्महत्या प्रकरणाचा पाठपुरावा न करण्याची धमकी अभिषेक परमार यांना देण्यात आली आहे.
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्‍या आत्‍महत्‍येनंतर सुसाईड नोट सापडली होती. त्‍यामध्‍ये लिहीले होते की, वारंवार पैशासाठी तगादा लावून मानसिक आणि शारिरीक छळ होत असल्याने आत्महत्या करत आहे. या प्रकरणी आरोपी नगरसेवक नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण आणि विक्रांत चव्हाण हे चौघे जण जामीनावर बाहेर आहेत. ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांचीही या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती.
अभिषेक परमार यांना धमकी दिल्‍याच्‍या वृत्‍ताला पोलिस आयुक्‍त परमबीर सिंग यांनी दुजोरा दिला आहे. परमार यांच्‍या आत्‍महत्‍येनंतर त्‍यांच्‍या परिवाराला संरक्षण देण्‍यात आले आहे. मात्र, अभिषेक यांना आलेला धमकीचा फोन कुणाचा हे अजून स्‍पष्‍ट झाले नाही. पोलिस या प्रकरणाचा कसुन तपास करत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा.. मुंबईकडे येणारी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
वोडाफोनने ग्राहकाला दिला 12 पैशांचा चेक, कुरिअरसाठी खर्च 50 रूपये