आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेखा पुणेकर यांना जीवनगौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘राजकारणी जसे आपली खुर्ची सोडत नाहीत, तशीच मीदेखील कायमची लावणीसम्राज्ञी आहे. माझा सन्मान हा लावणीचा सन्मान आहे. नारायणगाव ते शिवाजी मंदिर ते अमेरिका हा माझ्या कलेचा प्रवास मोठा खडतर होता, पण तो सुकर झाला केवळ प्रेक्षकांमुळे व कलेवरच्या प्रेमामुळे,’ असे मनोगत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले.

रवींद्र नाट्य मंदिर येथे शुक्रवारी महाराष्ट्र कला क्रीडा विकास प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष शिवकुमार लाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 21 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सोहळ्यात संजीवनी मुळे-देवधर, वर्षा दर्पे, कविता घडशी, देवयानी, प्रियंका शेट्टी, आसावरी तारे यांनी विविध लावण्या सादर करून पुणेकर यांना मानाचा मुजरा केला. सुरेखा पुणेकर यांनीही पारंपरिक लावण्या सादर करून भरभरून दाद मिळवली.