आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Prabhu Forced To Take A Ride In Mumbai Local

मुंबई लोकलमध्‍ये प्रभूंचा उभ्‍यानेच प्रवास, लोकांनी वाचला समस्‍यांचा पाढा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी यांनी आज दुसऱ्या दिवशीही मुंबई लोकलमधून प्रवास केला. खुद्द रेल्वे मंत्रीच लोकलमध्ये आल्‍याने काहींनी त्‍यांना बसण्‍यासाठी जागाही ऑफर केली. मात्र प्रभूंनी नकार देत उभ्यानेच प्रवास केला. त्‍यांनी गुरूवारीही करी रोड ते सीएसटी असा उभ्‍याने लोकलमधून प्रवास केला होता.

- आज सुरेश प्रभू यांनी पश्चिम रेल्वेवर खाररोड ते विलेपार्ले असा लोकलमधून प्रवास केला.
- अनेक लोकांनी त्‍यांच्‍यासमोर लोकलमधील समस्‍यांचा पाढा वाचला.
- लोकलच्‍या बोगींसह, टॉयलेटच्‍या सुविधांपर्यंत विविध प्रश्‍न लोकांनी या वेळी मांडले;
- लोकलमध्‍ये शिरल्‍यानंतर प्रभू यांनी काही लोकांशी संवाद साधला.
- दरवाज्‍यावर काही लोक सेल्‍फी घेण्‍यासाठी इच्‍छुक होते.
- घाटकोपरहून बसणा-या काही ज्‍येष्‍ठ नागरिकांनी प्रभूंकडे तक्रारी केल्‍या.
- काही वेळानंतर लोकांनी त्‍यांना सीट ऑफर केले. मात्र, त्‍यांनी नकार दिला.
- प्रवाशांनी केलेल्‍या तक्रारींवर तत्‍काळ कारवाई करा असे आदेश त्‍यांनी दिले आहेत.
- प्रभू यांनी लोकलमधून प्रवास करण्‍यासाठी कोणताही प्लॅन केला नव्‍हता.
प्रभू मुंबईत कशासाठी आले होते....
- रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रभूंनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतलेत.
- प्रभूंच्‍या या लोकल प्रवासानंतर प्रवाशांनी समाधान व्‍यक्‍त केले.
- मांटुगा रेल्वे कारखान्याच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरेश प्रभू मुंबईत आले होते.
- सुरेश प्रभू यांच्‍या हस्ते करीरोडच्या फूट ओव्हर ब्रिजचेही उद्घाटन कऱण्यात आले.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुरेश प्रभू यांच्‍यात अनेक प्रकल्पावर चर्चा झाली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, सुरेश प्रभू यांनी असा केला लोकलमधून प्रवास....