आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Prabhu Joins Bjp & 2nd Day Become A Cabinet Minister In Modi Govt

PHOTOS: शिवसेनेचा हा उच्चशिक्षीत नेता रातोरात भाजपात दाखल होत रेल्वेमंत्री झाला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- 9 नोव्हेंबर रोजी केंद्रीय कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेताना सुरेश प्रभू.)
मुंबई- शिवसेनेतील एक उच्चशिक्षीत नेता अशी ओळख असलेले सुरेश प्रभू हे मागील 7-8 वर्षापासून सेनेत अडगळीत पडले होते. एके काळी उद्धवच्या गटातील मानले गेलेले प्रभूंना उद्धव यांनीच खड्यासारखे बाजूला केले. कोकणातून प्रभूंचे तिकीट कापून विनायक राऊतांसारख्या दुय्यम शिवसैनिकाला खासदार बनण्याची संधी दिली पण प्रभूंना दिली नाही. त्यामुळेच दुखावलेले पण शांत, संयमी व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रभूंनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करीत रातोरात भाजपात प्रवेश केला व दुस-या दिवशी केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद मिळवत शिवसेना व उद्धव यांना वाखुल्या दाखवल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 नोव्हेंबर रोजी आपल्या कॅबिनेटमध्ये प्रभूंना सामावून घेत रेल्वेमंत्रालयासारखे अतिशय महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिली. मोदींनी प्रभूंना संधी देण्यामागे दोन प्रमुख कारणे. एक उद्धव ठाकरेंना शह देणे व दुसरे असे की, प्रभूंसारखा दर्जेदाक विद्याविभूषीत आपल्या कॅबिनेट ठेवणे. मोदींनी ही किमया साधत शिवसेनेला धोबीपछाड दिला. पण शिवसेनेला धोबीपछाड देण्याबरोबरच प्रभू यांच्यातील गुणवत्ता मोदींनी हेरली होती. त्यामुळेच त्यांना संधी दिली आहे.
कोण आहेत सुरेश प्रभू.. वाचू यात कल्पक व हुशार अशा हुरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाबाबत... पुढे स्लाईडद्वारे पाहा...