ठाणे (मुंबई)- येथील एक प्रसिद्ध सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 45 वर्षीय माणसाच्या पायावर ऑपरेशन सुरु होते. पण मध्येच हे ऑपरेशन थांबवण्यात आले. त्याचे झाले असे, की ऑपरेशन करणाऱ्या सर्जनला ऑपरेशन थिएटरमध्ये एक झुरळ दिसले. आता याची हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रार करायची तर पुरावा हवा. त्यामुळे सर्जनने ऑपरेशन बाजूला ठेवले. मोबाईलचा कॅमेरा ऑन केला. झुरळाचे शुटींग केले. त्यानंतर याची तक्रार प्रशासनाकडे केली. पण एखाद्या झुरळामुळे ऑपरेशन थांबण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार असावा.
गेल्या शुक्रवारी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. ऑपरेशन थिएटर म्हटले तर तेथे कमालिची स्वच्छता हवी. कारण एखादी बारीक चुकही रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. ऑपरेशन झाल्यानंतर इन्फेक्शन झाल्याने अनेक रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमधील स्वच्छतेला प्रचंड महत्त्व आहे.
वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. संजय बारानवल यांच्या नेतृत्वात डॉक्टरांची टीम येथे ऑपरेशन करत होती. त्यांनी या ठिकाणी पेस्ट कंट्रोल करण्यासंदर्भात प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. पण त्यावर काहीही कारवाई झाली नव्हती. ऑपरेश थिएटर सारख्या संवेदनशील ठिकाणीही पेस्ट कंट्रोल करण्यात आले नाही. त्यामुळे या ठिकाणी झुरळांसह इतर किटकांचाही मुक्त वावर असतो. आपली मागणी जोरकसपणे मांडण्यासाठी डॉ. बारानवल यांनी चक्क ऑपरेशन सोडून झुरळाचे शुटिंग केले.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कळवा येथील ऑपरेशन थिएटर चालवले जाते. पण येथे प्रचंड अस्वच्छता आहे. हॉस्पिटलच्या स्टाफने प्रशासनाकडे वारंवार याची तक्रार केली आहे. गेल्या महिन्यात या ठिकाणी ऑपरेशन करण्यात आलेल्या 25 टक्के रुग्णांना ऑपरेशननंतर इन्फेक्शन झाले होते.
पुढील स्लाईडवर वाचा... या प्रकरणाबाबत काय म्हणाले हॉस्पिटल डीन... कसे असायला हवे ऑपरेशन थिएटर... यापूर्वीही सापडले होते झुरळ...