आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यकांता चिक्की आरोग्यास घातक, FDA चा अहवाल, पंकजांना HC ची नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ अहमदनगर -अंगणवाड्यांतील बालकांसाठी विनानिविदा खरेदी करण्यात आलेली वादग्रस्त सूर्यकांता चिक्की खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल अन्न औषधी प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, या चिक्की वाटपावर बंदीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाने महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवून उत्तर देण्याचे निर्देश दिले. अंगणवाड्यांसाठी एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत चिक्कीसह २०६ कोटींच्या साहित्य खरेदीत घोटाळा केल्याचा पंकजा मुंडेंवर आरोप अाहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या नोटिसीमुळे त्यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या असून संदीप अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत सरकारी कंत्राट मिळालेल्या उत्पादकांच्या चिक्की निर्मितीवर बंदी घालण्याची मागणीही केली आहे. २० जुलैपर्यंत या नोटिसीला उत्तर द्यायचे आहे.
दरम्यान, जेथून या चिक्की घोटाळ्याला तोंड फुटले त्या अहमदनगर जिल्हा परिषदेने तपासणीसाठी पाठवलेल्या चिक्की नमुन्याचे अहवाल अन्न औषधी प्रशासनाने गुरुवारी दिले. या अहवालात चिक्की खाण्यास अयोग्य असल्याचे म्हटले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.