आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushiben Shah Chairman Of State Woman Commission

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुसीबेन शहा?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य महिला आयोगाच्या बहुप्रतीक्षित अध्यक्षाची घोषणा मंगळवारी करण्यात येईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात सोमवारी रात्री झालेल्या चर्चेत अंतिम निर्णय घेण्यात आला असून, कॉँग्रेसच्या सुसीबेन शहा यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ‘आदर्श’चा चौकशी अहवाल स्वीकारण्याबाबतही या बैठकीत निर्णय झाला.
काँग्रेस श्रेष्ठींनी आदर्श अहवाल फेटाळण्याचा सूचनावजा आदेश दिल्यानंतर यासंदर्भात राज्यात घडामोडींनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केली. माणिकराव व मुख्यमंत्र्यांमध्ये सुमारे चार तास झालेल्या चर्चेत महिला आयोग अध्यक्ष नेमणूक, आदर्श अहवाल, तसेच विविध महामंडळांवरील नेमणुकांबद्दल चर्चा झाली.
अध्यक्षपदासाठी सुसीबेन शहा, ललिता पाटील आणि विजया बांगडे यांची नावे चर्चेत होती. एका जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यंत अध्यक्षाची नेमणूक केली जाईल, अशी हमी कोर्टाला दिली होती.